भाजप देणार महाविकास आघाडीला धक्का; शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास देणार उमेदवार?

Rajyasabha Election 2026 : महाराष्ट्रातील 7 जागांसाठी राज्यसभा निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त एक दिवस बाकी

Rajyasabha Election 2026

Rajyasabha Election 2026 : महाराष्ट्रातील 7 जागांसाठी राज्यसभा निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त एक दिवस बाकी असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कुणाला संधी मिळणार याबाबत राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सध्या तरी या निवडणुकीबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीने वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे. आकडेवारीचा विचार केला असता 7 पैकी 6 जागांवर महायुती बाजी मारणार आहे तर एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे.

महायुतीमध्ये (Mahayuti) भाजपला (BJP) 4, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेला (Shivsena) प्रत्येकी एक- एक जागा मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर भाजपने विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते, रामराव वडकुते यांना संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये (MVA) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून देखील दावा करण्यात येत असल्याने महाविकास आघाडीकडून कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे जर शरद पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाली नाही तर भाजपकडून पाचवा उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजप मोठा डाव टाकणार का? याबाबत देखील आता चर्चा सुरु झाली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित मानलं जात आहे. मात्र ज्योती वाघमारे, शायना एनसी, संजय निरुपम यांच्या नावाची देखील चर्चा सुरु असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

सावध, ‘या’ चुकांमुळे तुमचं बँक अकाउंट अचानक लॉक होणार! जाणून घ्या नियम-

राज्यसभेसाठी 16 तारखेला मतदान

राज्यसभेसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 37 पैकी महाराष्ट्रात 7 जागांसाठी निवडणूक होणार असून 6 जागांवर महायुती आणि एका जागेवर महाविकास आघाडी बाजी मारणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसह तमिळनाडूतील 6, बिहार आणि बंगालमधील प्रत्येकी 5 , ओडिशामधील 4, आसाममधील 3, तेलंगाणातील 2 आणि छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येकी एका राज्यसेभेच्या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहे.

follow us