सावध, ‘या’ चुकांमुळे तुमचं बँक अकाउंट अचानक लॉक होणार! जाणून घ्या नियम

Bank Account Lock : गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात डिजिटल क्रांती आल्याने आज दररोज लाखोंचे व्यवहार ऑनलाईन स्वरुपात सुरु आहेत.

Bank Account Lock

Bank Account Lock : गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात डिजिटल क्रांती आल्याने आज दररोज लाखोंचे व्यवहार ऑनलाईन स्वरुपात सुरु आहेत. डिजिटल व्यवहाराची संख्या वाढल्याने देशात बँक खात्यांची देखील संख्या झपाट्याने वाढलीय. आज अनेकांकडे एकापेक्षा जास्त बँक खाते आहेत पण तुम्हाला माहिती आहे का? काही चुकांमुळे तुमचं बँक खाते लॉक देखील होऊ शकते. इकडे हे लक्षात घेण्यासारखे की, बँकांकडून विनाकारण खाते लॉक करण्यात येत नाही पण कधी कधी नियम आणि सुरक्षितेमुळे बँक खाते लॉक करण्यात येतात. तर जाणून घेऊया की, बँक खाते लॉक होण्यापाठीमागचे कारणे काय?

संशयास्पद व्यवहार

आजकाल बँका लेटेस्ट टेक्नोलॉजीच्या मदतीने प्रत्येक ग्राहकाचा एक विशिष्ट खर्च आणि व्यवहार नमुना तयार करत असतात. त्यामुळे जर त्या खात्यात अचानक मोठी रक्कम आली किंवा कमी कालावधीत अनेक मोठ्या ट्रॅन्झॅक्शन्स होत असेल तर सिस्टम अलर्ट जारी करते यानंतर बँक तपास पूर्ण होईपर्यंत बँक खाते लॉक करण्यात येतेय.

संशयित फसवणूक

जर तुमच्या बँक खात्याचा कोणी गैरवापर करत असल्याचा बँकेच्या लक्षात आले तरी देखील सुरक्षितेच्या कारणास्तव तुमचे बँक खाते लॉक करण्याचा अधिकार बँकेकडे आहे. तर कधीकधी, ग्राहक स्वतः तक्रार करतात की, त्यांच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार झालाय. अशा प्रकरणांमध्ये, पुढील नुकसान टाळण्यासाठी बँक खाते लॉक करण्यात येतेय.

न्यायालय किंवा सरकारी एजन्सीचा आदेश

जर तुमच्याविरुद्ध कायदेशीर खटला प्रलंबित असेल, आयकर चौकशी सुरू असेल किंवा सरकारी एजन्सीने आदेश जारी केला असेल, तर बँकेला तुमचे खाते लॉक करु शकते. चौकशी पूर्ण होईपर्यंत खाते लॉक राहू शकते. अशा प्रकरणांमध्ये बँकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असतेय.

केवायसी अपडेट

जर तुम्ही केवायसी देखील पूर्ण केली नसेल तरी देखील बँक खाते लॉक होऊ शकते. जर तुम्ही  आधार, पॅन किंवा पत्त्याशी संबंधित कागदपत्रे वेळेवर सादर केलीय नाही तर बँक व्यवहार ब्लॉक करू शकते.

मनी लाँडरिंग नियमांचे उल्लंघन

मनी लाँडरिंग रोखण्यासाठी बँका कठोर नियमांचे पालन करतात. जर मोठ्या प्रमाणात रक्कम खात्यात वारंवार जमा केली जात असेल, परंतु त्यांचा स्रोत अस्पष्ट असेल, तर चौकशी सुरू केली जाऊ शकते. चौकशी पूर्ण होईपर्यंत खाते लॉक असू शकते.

बँक खाते लॉक असेल तर काय करावे?

प्रथम तुमच्या बँक शाखेशी किंवा ग्राहक सेवेशी संपर्क साधा. कारण शोधा आणि आवश्यक कागदपत्रे ताबडतोब सादर करा. बऱ्याचदा, योग्य माहिती दिल्यानंतर खाते पुन्हा सक्रिय केले जाते.

भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1700 अंकांनी कोसळला, 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान-

भविष्यात ही समस्या कशी टाळायची?

तुमचे केवायसी नियमितपणे अपडेट ठेवा.

खात्याच्या ट्रॅन्झॅक्शन्स लक्ष ठेवा.

ओटीपी किंवा बँक तपशील कोणाशीही शेअर करू नका.

कोणत्याही संशयास्पद व्यवहारांची त्वरित तक्रार करा.

follow us