आहिल्यानगर, मुंबई अन् नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास धो धो पाऊस; अलर्ट जारी
IMD Rain Alert : राज्यातील अनेक भागात दिवाळीपासून मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसताना दिसत आहे.
IMD Rain Alert : राज्यातील अनेक भागात दिवाळीपासून मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसताना दिसत आहे. यातच आता पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने 2 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मोंथा चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक ठिकाणी आज आणि उद्या पावासाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD Rain Alert) दिलेल्या माहितीनुसार, मोंथा चक्रीवादळामुळे (Cyclone Montha) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मुंबई, नाशिक, अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये 2 नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात मुंबईमध्ये हलका ते मुसळधार पावासाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे आज सकाळपासूनच मुंबईत (Mumbai) ढगाळ वातावरण पाहायाल मिळत आहे. तर जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, रायगड, धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघरसह काही जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मोंथा चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
A Perfect Murder मध्ये दिप्ती भागवतचा रहस्यमय प्रवास
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावासामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर कर्ज माफी द्यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आर्थिक पॅकेज देखील जारी केले आहे मात्र आतापर्यंत कर्जमाफीवर निर्णय न झाल्याने विरोधक राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे.
लागणार लॉटरी अन् मिळणार कोट्यवधींचं बक्षीस; ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 बक्षीस रक्कम जाहीर
