मराठा आरक्षणाचा प्रश्न भडकला; सरकारने फसवणूक केली तर आम्ही तुम्हाला जेरीस आणू, जरांगेंची आक्रमक भूमिका

मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी जालन्यातून सरकारला थेट इशारा देत आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 43

The issue of Maratha reservation flared up : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी जालन्यातून सरकारला थेट इशारा देत आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. मराठे पुन्हा मुंबईकडे कूच करण्यास सज्ज आहेत, असे सांगत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

जरांगे म्हणाले की, सरकारने दिलेल्या आश्वासनांवर मराठा समाजाने विश्वास ठेवला होता. मात्र तो विश्वास पुन्हा तुटू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आमचा विश्वासघात करू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील.

दरम्यान, आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत बोलताना जरांगे यांनी स्पष्ट केले की, जून महिन्यात पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, याची जबाबदारी सरकारचीच आहे. आम्ही शांत आहोत, मात्र याचा अर्थ आम्ही दुर्बल नाही. मराठा समाज जितका संयमाने वागतो, तितक्याच ताकदीने तो लढायला देखील तयार असतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली, अर्ध्यापेक्षा जास्त खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

हैद्राबाद गॅजेट संदर्भात देखील त्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर मराठ्यांना आरक्षण नसते, तर हैद्राबाद गॅजेटचा जीआर काढण्याची गरज नव्हती. सरकारनेच आशा निर्माण केली आणि आता मागे हटत असेल, तर ही सरळ फसवणूक आहे, असा घणाघाती आरोप यावेळी त्यांनी केला. सरकारने जर मराठा समाजाची फसवणूक केली, तर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. आम्ही सरकारला जेरीस आणू, गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं नाही, तर आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करू की, त्याची कल्पना देखील केलेली नसेल, असं यावेळी ते म्हणाले. एकंदरीत, मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेट घेण्याच्या मार्गावर असून, येत्या काही दिवसांत सरकार आणि आंदोलक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us