मुंबईतील भांडुप भागात विजेच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू; लोकांनी आवाज दिला पण…

मुंबईतील भांडुप भागात विजेच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू; लोकांनी आवाज दिला पण…

Mumbai Rain : मुंबईतील भांडुप परिसरामध्ये काल दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. (Rain) सतरा वर्षीय दीपक पिल्ले या तरुणाचा भर पावसात विद्युत धक्क्यामुळे मृत्यू झाला. दीपक हा एल बी एस मार्गावरून आपल्या घराकडे निघाला होता. पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले होते. त्या दरम्यान, पन्नालाल कंपाऊंड परिसरात ही घटना घडली.

या भागातूनच महावितरणची हाय टेन्शन वायर खुली पडली होती. दीपक कानात हेडफोन लावून रस्त्याने चालत होता. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यास सांगितलं, पण कानात हेडफोन असल्यामुळं त्याला काहीही ऐकू आलं नाही. दुर्दैवाने तो त्या उघड्या विद्युत तारेच्या संपर्कात आला आणि क्षणातच त्याला जबरदस्त विद्युत धक्का बसून त्याचा मृत्यू झाला.

तीन दिवसांच्या मुसळधार बॅटींगनंतर मुंबई पावसाचा जोर ओसरला, पुढील 3 तासांचा अंदाज काय?

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी वायर उघडी असल्याने धोका कायम होता. नागरिकांनी अनेकांना या मार्गाने जाताना इशारे देऊन सावध केलं होतं. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. परंतु, दीपकच्या कानात हेडफोन असल्यामुळे तो आवाज ऐकू शकला नाही. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी या तरुणाचा जीव वाचवता आला नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि महावितरण अधिकाऱ्यांनाही याबाबत सूचित केले. मात्र, पावसाळ्यात अशा प्रकारे उघड्या तारा जीवघेण्या ठरत असल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महावितरणला तातडीने सुरक्षिततेची उपाययोजना करण्याचे आवाहन केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube