मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा

Maharashtra Cabinet Meeting : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) आज महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागासाठी निर्णय घेण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या (Tata Memorial Center) एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आला आहे. तसेच कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड, संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.697/3/6 मधील 2 हे. 50 आर जमीन देण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला – कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर 29 दिवस तत्त्वावर कार्यरत 17 कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहे.
मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय
मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ.
कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड, संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.697/3/6 मधील 2 हे. 50 आर जमीन देणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला – कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)
मोठी बातमी, आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिल उपकर्णधार
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर 29 दिवस तत्त्वावर कार्यरत 17 कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मान्यता. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)