ब्रह्माकुमारीची राखी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना

Devendra Fadanvis: योगीराज सदगुरु श्री गंगागिरी महाराज यांचा 178 वा अखंड हरिनाम सप्ताह नुकताच पार पडला. सप्ताह सांगता सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सोनई सेवाकेंद्राच्या संचालिका बी के उषादीदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना राखी बांधली. यावेळी बी के 183 विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. दीपक हरके उपस्थित होते.
याच दरम्यान कृषिमहोत्सव देवगाव शनी येथे आयोजित करण्यात आला होता. या कृषी महोत्सवात तीनशे स्टॉलद्वारे संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामग्री, पशुधन जैव, ऊर्जा वाटिका, शेती लघू उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली होती.
याची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांना प्रदान केले. यावेळी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे उपस्थित होते.