IND vs AUS Final : विश्वचषकाची फायनल, रोहित शर्माने केला एक खास विक्रम

IND vs AUS Final : विश्वचषकाची फायनल, रोहित शर्माने केला एक खास विक्रम

IND vs AUS Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील विश्वचषकाचा (world cup 2023) अंतिम सामना सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि त्यानंतर रोहितने (rohit sharma) नवा विश्वविक्रम केला. रोहित शर्मा आता कर्णधार म्हणून विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

रोहित शर्माने नवा विक्रम केला
रोहित शर्मा या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाला, पण त्याने एक शानदार विश्वविक्रम रचला. रोहित आता कोणत्याही एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने या विश्वचषकातील 11 सामन्यांमध्ये एकूण 597 धावा केल्या आहेत, जो विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.

कपिल देवचे व्हिजन, गांगुलचे अ‍ॅग्रेशन अन् धोनीचा संयम : कर्णधार म्हणजे काय रोहितने दाखवून दिले!

या विक्रमात रोहितने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऑरॉन फिंच यांना मागे टाकले आहे.

IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी का घेतली ? टीम इंडियाच्या धोक्याचं कारण कमिन्सने सांगितलं

अशी आहे कर्णधार म्हणून फलंदाजी
– रोहित शर्माने 2023 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 597 धावा केल्या आहेत.
– केन विल्यमसनने 2019 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 578 धावा केल्या होत्या.
– महेला जयवर्धनेने 2007 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 548 धावा केल्या होत्या.
– रिकी पाँटिंगने 2003 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 539 धावा केल्या होत्या.
– ऑरॉन फिंचने 2019 विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून 507 धावा केल्या होत्या.

टीम इंडियाचा स्कोर 121-3
25.3 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन विकेटवर 134 धावा आहे. भारतीय फलंदाजांना बराच काळ चौकार मारता आलेला नाही. केएल राहुल 56 चेंडूत 27 तर किंग कोहली 56 चेंडूत 50 अर्धशतक पूर्ण केलं

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube