IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी का घेतली ? टीम इंडियाच्या धोक्याचं कारण कमिन्सने सांगितलं
IND vs AUS Final : विश्वचषकातील अंतिम सामन्याचा थरार आता सुरू (IND vs AUS Final) झाला असून टीम इंडियाला सुरुवातीलाच तीन मोठे धक्के बसले आहेत. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच रोहित शर्मा (47), शुभमन गिल (4) आणि श्रेयस अय्यर (4) या फलंदाजांना माघारी धाडले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी भरात दिसत असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय फायद्याचा ठरताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय का घेतला याचं उत्तर कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) दिले आहे. खेळपट्टी पाहून कमिन्स नाराज झाला होता. गोलंदाजीचा निर्णय घेताना या गोष्टीचाही त्याने विचार केल्याचे दिसत आहे.
साखळी फेरीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना याच मैदानावर झाला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर पॅट कमिन्स म्हणाला, आम्ही या पिचवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, विकेट जास्त कोरडी वाटत आहे. तसेच संध्याकाळ होईल त्यावेळी दवबिंदू (आर्द्रता) पडतील त्यामुळे मैदानात ओलावा राहिल. त्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अडचणी कमी होतील. या स्पर्धेतील आमची सुरुवात चांगली नव्हती. मात्र, त्यानंतर आम्ही चुका टाळल्या. आता सारंकाही सुरळीत झालं आहे, असे कमिन्स म्हणाला.
IND vs AUS Final : तडाकेबाज सुरुवातीनंतर भारताचा डाव गडगडला, विराट-राहुलने डाव सांभाळला
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यालाही खेळपट्टीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी रोहित म्हणाला की या खेळपट्टीवर आम्हाला प्रथम फलंदाजीच करायची होती. रोहित शर्माला या खेळपट्टीपासून काहीच अडचण नाही आणि प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळणार म्हणून तो आनंदी दिसत होता. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी संघाच्या खेळाडूंत कोणताही बदल केलेला नाही.
रोहित शर्माचा नवा विक्रम
रोहित शर्मा आता कर्णधार म्हणून विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.रोहित शर्माने अंतिम सामन्यात 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाला, पण त्याने एक शानदार विश्वविक्रम रचला. रोहित आता कोणत्याही एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने या विश्वचषकातील 11 सामन्यांमध्ये एकूण 597 धावा केल्या आहेत, जो विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.
IND vs AUS Final : फायनल सामना बरोबरीत राहिला तर विनर कोण? ICC ने आणला नवा नियम