Ind vs Aus: टीम इंडिया समोर ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान; ‘ही’ आहेत ऑस्ट्रेलियन संघाची बलस्थान
Cricket World Cup Final 2023: अवघ्या क्रिकेट विश्वाला सध्या उत्कंठा लागली ती विश्वषकाच्या अंतिम सामन्याची. गेल्या दीड महिन्यापासून जगभरातील क्रिकेट खेळणारे देश भारतातील वेगवेगळ्या मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकले. काही सामने जिंकले, काही हरले. अखेर या सर्व देशांमधून भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs AuS) अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) भारत आणि ऑस्ट्रेलियात अंतिम सामना होणार आहे.
“कोणी उपोषणाला बसले अन् अंतिम मुदत दिली म्हणून…” : मागासवर्ग आयोगाने जरांगेंना फटकारले
पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचं कडव आव्हानं भारतीय टीम पुढं आहे. त्यामुळं भारतीय खेळाडूंना गाफील राहून चालणार नाही. ऑस्ट्रेलियन संघाची कची केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीच उत्तम आहे, असं नाही. तर फिल्डिंगनेही सामना जिंकण्याची क्षमता ऑस्ट्रेलियाकडे आहे. चेंडू सीमारेषेवर स्लाइड लावून थांबवणे, डायरेक्ट ट थ्रोने रनआउट मिळवणे किंवा हवेत उडी मारून कॅच पकडणं, या सर्वच बाबतीत ऑस्ट्रोलियाची टीम निपून आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि टीमला खूपच सावधगिरीने सामना खेळण्याची गरज आहे.
टीम इंडियाच्या फलंदाजांना त्यांचे शॉट सिलेक्शन आणि रनिंग बिटवीन द विकेटवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण एका छोट्याशा चुकीचेही खूप मोठे परिणाम होऊ शकतात. भारतीय संघाने 10 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आणि साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचाही पराभव केला. असे असले तरी प्रतिस्पर्ध्यासमोर प्रत्येक विभागात भारतीय संघाला आपल्या खेळाची पातळी उंच ठेवावी लागेल.
ऑस्ट्रेलियन खेळाडू दमदार फिल्डींगने दडपण निर्माण करतात
ऑस्ट्रेलियन खेळाडू मानसिकदृष्ट्या खूप मजबूत मानले जातात. नुकत्याच झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही हे दिसून आले. भारतीय संघाला कोणत्याही सत्रात पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही आणि ऑस्ट्रेलिया विश्व कसोटी चॅम्पियन बनला. या विश्वचषकात ग्लेन मॅक्सवेलची अफगाणिस्तानविरुद्धची २०१ धावांची खेळी कोण विसरूस शकणार नाही. मानसिक बळामुळे ऑस्ट्रेलियन संघ 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये पाच वेळा विश्वविजेता बनला आहे. आयसीसीची सर्व विजेतेपदे जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ आहे.
टीम इंडियाला कॅचिंग आणि फिल्डिंगवर भर देण्याची गरज
माजी कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर फलंदाज सुनील गावस्कर म्हणतात की, भारतीय संघाला आपल्या फिल्डिंग आणि कॅच पकडण्यावर अधिगक लक्ष देण्याची गरज आहे. हा अंतिम सामना आहे, त्यामुळं सर्वोत्तम फिल्डर हे बोर्डवर असले पाहिजेत. जेव्हा शेवटची ओवर असते तेव्हा तेव्हा फलंदाज चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न करतात आणि तेथे वेगवान क्षेत्ररक्षक असणे महत्वाचे आहे. कारण जेव्हा चौकार थांबवल्यानंतर दोन धावा दिल्या जातात तेव्हा फलंदाजांची बाजू खूपच निराश होते. त्यामुळे विराट कोहली, रवींद्र जडेजा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, कुलदीप कुमार यादव या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांनी सीमारेषेवर असंल पाहिजे.
गोलंदाजीच विविधता आणावी लागेल
ऑस्ट्रेलियन संघ सरावासाठी आला तेव्हा त्यांनी ५ तासांच्या अवधीमध्ये तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. पाच तासात खेळपट्टीच्या कोरडेपणात किती फरक पडतो, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांना तेज मारा करताना अगदी थोडा वेळ मदत मिळेल. याचाच अर्थ असा की वेगवान गोलंदाजांना नुसता वेग वापरून चालणार नाही. गोलंदाजीच विविधता आणावी लागेल.
गोलंदाजीतच वैविध्य आणावे लागेल
ऑस्ट्रेलियन संघ सरावासाठी आला तेव्हा त्यांनी २४ तासांत तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. पाच तासांमध्ये खेळपट्टीच्या कोरडेपणातील फरकाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. या धावपट्टीवर खेळणं दोन्ही संघासाठी आव्हान असणार नाही. या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा पराभव करायचा असेल तर गोलंदाजीत विविधता आणावी लागेल.
ऑस्ट्रेलियाने पाचवेळा तर भारताने दोनदा जिंकला विश्वचषक
भारतीय संघाला अंतिम सामन्यात खराब क्षेत्ररक्षण टाळावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जातात. ऑस्ट्रेलियन संघ विक्रमी आठव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे तर भारताने 2 वेळा विजेतेपद पटकावले आहे. आता या दोन्ही संघांमधील विश्वचषक फायनलमध्ये कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.