IND vs AUS Final : ..अन् अचानक सामना थांबला! प्रसंग असा की सगळेच गोंधळले

IND vs AUS Final : ..अन् अचानक सामना थांबला! प्रसंग असा की सगळेच गोंधळले

IND vs AUS Final : विश्वचषकातील अंतिम सामना अहमदाबाद येथील (IND vs AUS Final) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा संघ प्रथम फलंदाजी करत असून भारताची अवस्था खराब झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा बाद झाले आहेत. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजी करत असताना असा एक प्रसंग घडला ज्यामुळे काही वेळ सामना थांबवावा लागला. सामन्यादरम्यान एका पॅलेस्टाईन समर्थकाला पोलिसांनी अटक केली.

इस्त्रायल हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. आज भारतात खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्या दरम्यान पॅलेस्टिनी समर्थक सुरक्षा व्यवस्थेला गुंगारा देत थेट मैदानात घुसला. अचानक घडलेल्या या घटनेने एकच गोंधळ उडाला. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. हा प्रसंग घडला त्यावेळी विराट कोहली 29 धावांवर तर केएल राहुल 6 धावांवर खेळत होते. यानंतर पोलिसांनी हालचाली करत या व्यक्तीला ताब्यात घेतले.

IND vs AUS Final : विश्वचषकाची फायनल, रोहित शर्माने केला एक खास विक्रम

याआधी पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यात पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावणाऱ्या आणि समर्थनाच्या घोषणा देणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले. कोलकाता पोलिसांनी ही कारवाई केली होती. विश्वचषकात अशा घटना घडत असल्याने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. तरी देखील आजच्या अंतिम सामन्यातील पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था तोडून हा पॅलेस्टाईन समर्थक मैदानात घुसला होता. त्यामुळे पोलीस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

रोहित शर्माचा नवा विक्रम

रोहित शर्मा आता कर्णधार म्हणून विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.रोहित शर्माने अंतिम सामन्यात 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाला, पण त्याने एक शानदार विश्वविक्रम रचला. रोहित आता कोणत्याही एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने या विश्वचषकातील 11 सामन्यांमध्ये एकूण 597 धावा केल्या आहेत, जो विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.

IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी का घेतली ? टीम इंडियाच्या धोक्याचं कारण कमिन्सने सांगितलं

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय यशस्वी 

नाणेफेक जिंकल्यानंतर पॅट कमिन्स म्हणाला, आम्ही या पिचवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, विकेट जास्त कोरडी वाटत आहे. तसेच संध्याकाळ होईल त्यावेळी दवबिंदू (आर्द्रता) पडतील त्यामुळे मैदानात ओलावा राहिल. त्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अडचणी कमी होतील. या स्पर्धेतील आमची सुरुवात चांगली नव्हती. मात्र, त्यानंतर आम्ही चुका टाळल्या. आता सारंकाही सुरळीत झालं आहे, असे कमिन्स म्हणाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube