IND vs AUS Final : बदली खेळाडू म्हणून आला पण, जिगरबाज ठरला; लाबुशेनची शानदार खेळी
IND vs AUS Final : भारताने 241 धावांचे दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून (IND vs AUS Final) पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप (World Cup 2023) पटकावला आहे. ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 धावा करत शतक झळकावले. मार्नस लाबुशेनने नाबाद 58 धावा करत अर्धशतक केलं. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तसं पाहिलं तर सुरुवातीला निवड समितीने लाबुशेनचा (Marnus Labuschagne) विचारही केली नव्हता. त्यानेच या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले, ऑस्ट्रेलियाचा विजेतेपदाचा ‘षटकार’
विश्वचषक स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार होता. प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने लाबुशेनचा समावेश करण्यात आला. पण, विश्वचषकासाठी निवड न झाल्याने त्याच्या मनात नाराजी होती. त्याने ही नाराजी त्याच्या खेळातून दाखवून दिली. पहिल्याच सामन्यात धडाकेबाज 80 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पुढील सामन्यात आधीच्या सामन्याच्या तुलने आणखी चांगला खेळ केला. पुढील दोन सामन्यात मात्र त्याला फार काही करता आला नाही. या कामगिरीनंतरही त्याची विश्वचषकात निवड होणार नव्हती. तर भारतात येण्यासाठी लाबूशेन ट्रॅव्हलिंग रिजर्व्ह म्हणून दाखल झाला.
यानंतर मुख्य संघातील खेळाडू अॅश्टन एगर दुखापतीमुळे खेळू शकणा नाही हे सिद्ध झालं. त्यानंतर दुसऱ्या एखाद्या फिरकीपटूला संघात घेतलं जाईल असं वाटत होतं पण तसं काही घडली नाही. निवड समितीने फलंदाज आणि कामचलाऊ फिरकीपटू असलेल्या लाबुशेनची निवड केली. सर्वांसाठी हा धक्का होता. पण, तरीही त्याला संघात ठेवण्यात आलं. त्याच्या बाबतीत मात्र विशेष नाही. कारण लाबुशेन याआधीही अनेकदा असाच बदली खेळाडू म्हणून संघात सहभागी झालेल आहे. या संधींचा फायदा घेत त्याने चांगली कामगिरी मात्र केली आहे. आजच्या सामन्यातही लाबुशेनने अशीच कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
IND vs AUS Final : ..अन् अचानक सामना थांबला! प्रसंग असा की सगळेच गोंधळले
अंतिम सामन्यात सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या मार्नस लॅबुशेनच्या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी केली. या दोघांसमोर भारताचे सर्व गोलंदाज अपयशी ठरले. हेडने शतक तर लॅबुशेनने अर्धशतक झळकावले. दोन्ही फलंदाजांनी हुशारीने डाव पुढे नेत कांगारू संघाला विजयापर्यंत नेले. मात्र, ट्रॅव्हिस सामना जिंकण्यापूर्वी 2 धावांवर बाद झाला.