Asia Cup 2025 : 5 षटकारांचा जल्लोष… पण क्षणात दुःखात बदलला माहोल; वेल्लालागेच्या वडिलांचं निधन कळताच नबी…

नबीने ज्याच्या षटकात हे पाच षटकार ठोकले, त्या श्रीलंकेच्या तरुण गोलंदाज दुनिथ वेल्लालागे (Dunith Wellalage) यांच्या वडिलांचे सामन्यादरम्यान निधन झाले.

Mohammad Nabi Shocks Wellalage Father Death

Asia Cup 2025 Sri Lanka vs Afghanistan : आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये 18 सप्टेंबर रोजी झालेल्या श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (Sri Lanka vs Afghanistan) सामन्यात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) शेवटच्या षटकात सलग पाच षटकार ठोकून मैदान गाजवलं. पण सामन्यानंतर समोर आलेल्या धक्कादायक बातमीने सगळ्यांनाच हादरवून टाकलं. नबीने ज्याच्या षटकात हे पाच षटकार ठोकले, त्या श्रीलंकेच्या तरुण गोलंदाज दुनिथ वेल्लालागे (Dunith Wellalage) यांच्या वडिलांचे सामन्यादरम्यान निधन झाले.

नबीचा अविश्वसनीय खेळ

श्रीलंकेकडून 20 वे षटक टाकण्यासाठी वेल्लालागे आले होते. या षटकात नबीने (Mohammad Nabi) तब्बल पाच षटकार ठोकत सामना रंगतदार केला. त्याने फक्त 20 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अफगाणिस्तानचा डाव एक टप्प्यावर 13 व्या षटकात (Asia Cup 2025) 79 धावांवर सहा गडी गमावून डळमळीत स्थितीत होता. मात्र, नबीच्या विस्फोटक फलंदाजीमुळे ( Wellalage Father Death) संघाने 20 षटकांत 8 बाद 169 धावा केल्या.

वेल्लालागेच्या वडिलांचं निधन कळल्यावर नबी…

सामना संपल्यानंतर जेव्हा एका पत्रकाराने वेल्लालागेच्या वडिलांच्या (Sri Lanka vs Afghanistan) निधनाची माहिती नबीला दिली, तेव्हा तो पूर्णपणे स्तब्ध झाला. व्हिडिओमध्ये दिसतं की, नबीने पुन्हा पत्रकाराला विचारून खात्री करून घेतली. तो काही क्षण बोलताही आला नाही. हा व्हिडिओ (Cricket) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सामना मात्र श्रीलंकेच्या नावावर

अफगाणिस्तानने उभारलेला 169 धावांचा टप्पा श्रीलंकेसाठी कठीण वाटत नव्हता. 19.2 षटकांत श्रीलंकेने लक्ष्य सहज गाठत 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे श्रीलंका आणि बांगलादेश सुपर-4 मध्ये पोहोचले, तर अफगाणिस्तान आणि हाँगकाँगला स्पर्धेबाहेर जावं लागलं.

follow us