Asia Cup 2025 : मोठी बातमी, पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर, आज UAE विरुद्ध खेळणार नाही
Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये एक नवीन ट्विस्ट आला आहे. पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे आशिया कप

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये एक नवीन ट्विस्ट आला आहे. पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे आशिया कप 2025 मध्ये आज होणारा पाकिस्तानविरुद्ध युएई सामना रद्द झाला असल्याची माहिती जिओ न्यूज पाकिस्तानने दिली आहे.
जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, पीसीबीने (PCB) आपल्या खेळाडूंना हॉटेलमध्ये राहण्याचे आणि मैदानात न जाण्याचे आदेश दिले आहेत. भारताविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी शेक हॅन्ड न केल्याने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट (Andy Pycroft) यांना काढून टाकण्याची मागणी पाकिस्तानकडून (Asia Cup 2025) करण्यात आली होती मात्र आयसीसीने ही मागणी मान्य केल्याने पाकिस्तानने या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पाकिस्तानी जिओ न्यूजने दिली आहे.
तर दुसरीकडे आज पाकिस्तान ग्रुप ए मध्ये युएईविरुद्ध (PAKvsUAE) नॉकआऊट सामना खेळणार होता. या सामन्यात जिंकणारा संघ टीम इंडियासोबत सुपर फोरमध्ये प्रवेश करणार होता मात्र यापूर्वीच पीसीबीने मोठा निर्णय घेत आशिया कप 2025 मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आशिया कप 2025 मध्ये पुढे काय होणार याबाबात अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहे. जिओ न्यूजने दिलेल्या माहिती पीसीबीच्या मागण्या पूर्ण न झाल्याने पाकिस्तानने हा निर्णय आयसीसीला ईमेल पाठवल्यानंतर घेतला आहे.
नेमकं प्रकरण काय?
भारताविरुद्ध 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी शेक हॅन्ड करण्यास नकार दिल्यानंतर वाद सुरु झाला होता. पाकिस्तान बोर्डाने दावा केला की रेफरी पायक्रॉफ्टने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यांना टॉस दरम्यान शेक हॅन्ड करु नये असे सांगितले. यानंतर पाकिस्तानने आयसीसीकडे रेफरी पायक्रॉफ्ट यांनी आशिया कपमधून बाहेर काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास युएईविरुद्धच्या सामन्यावर आणि संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली.
बेनामी संपत्ती प्रकरणात चौकशी होणार, न्यायालयाने दिले आदेश; मंत्री भुजबळ अडचणीत?