आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, ‘या’ दोन सीनियर खेळाडूंची सुट्टी; कर्णधार कोण?

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, ‘या’ दोन सीनियर खेळाडूंची सुट्टी; कर्णधार कोण?

Pakistan Cricket Team Announced for Asia Cup 2025 : आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी (Asia Cup 2025) पाकिस्तानच्या संघाची घोषणा (Pakistan Cricket Team) झाली आहे. यावेळी निवड समितीने टीममध्ये मोठा बदल केला आहे. दुखापतीनंतर फखर जमां याला पुन्हा टीममध्ये घेण्यात आले. तर कर्णधार रिजवान आणि बाबर आझम या दोघांना संधी मिळालेली नाही. आशिया कप क्रिकेट स्पर्धा येत्या 9 सप्टेंबरपासून युएईत सुरू होणार आहे.

या स्पर्धेत पाकिस्तान ग्रुप ए मध्ये आहे. या गटात भारत, ओमान आणि युएई आहे. पाकिस्तानचा पहिला सामना 12 सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध होणार आहे. यानंतर 14 सप्टेंबरला दुसरा सामना भारताशी होणार आहे. यानंतर 17 सप्टेंबरला साखळी फेरीतील तिसरा सामना यूएई विरुद्ध होणार आहे. आशिया कप स्पर्धेआधी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई यांच्यात एक मालिका होणार आहे. यासाठी पाकिस्तान टीम 22 ऑगस्टपासून आयसीसी अॅकेडमीत सराव सुरू करणार आहे. या मालिकेत पाकिस्तान टीम चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पाकिस्तानी खेळाडू नापास, बोर्ड पगार कापणार; सीनियर खेळाडूंना बसणार कोट्यावधींचा फटका

सलमान आगाकडे कर्णधारपद

आशिया कप स्पर्धेसाठी अष्टपैलू खेळाडू सलमान आगाकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बांग्लादेश विरुद्ध टी 20 मालिकेत पराभव झाल्यानंतर वेस्टइंडिज विरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानने कमबॅक केले होते. मालिका 2-1 ने जिंकली होती. याआधी 2023 मध्ये आशिया कप वनडे प्रकारात झाला होता. या स्पर्धेत टीम इंडिया चॅम्पियन ठरली होती.

असा असेल पाकिस्तानचा संघ

सलमान आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमां, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, हारिस, नवाज, साहिबजादा फरहान, सॅम अय्यूब, सलमान मिर्जा, शाहीन शाह अफ्रिदी, सुफियान मुकीम.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube