Pak Vs SL T20 : बाबर आझम, शाहीन आफ्रिदीसह ‘या’ 4 स्टार खेळाडू पाकिस्तान संघातून बाहेर; कारण काय?
Pak Vs SL T20 : पीसीबीने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर केला असून या संघातून बाबर आझमसह अनेक स्टार खेळाडूंना
Pak Vs SL T20 : पीसीबीने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर केला असून या संघातून बाबर आझमसह अनेक स्टार खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आले आहे. 15 खेळाडूंच्या या संघात बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदीसारख्या खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आले आहे. पीसीबीच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर पीसीबीवर जोरदार टीका होताना दिसत आहे मात्र आता याबाबत पीसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पीसीबीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बाबर आझम (Babar Azam) , मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan), शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आणि हरिस रौफ (Haris Rauf) हे बिग बॅश लीग (BBL) मध्ये खेळत आहे. यामुळे त्यांना श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची मालिका 7 जानेवारी पासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 7 जानेवारी रोजी तर दुसरा सामना 9 आणि तिसरा सामना 11 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे तर दुसरीकडे 25 जानेवारीपर्यंत बिग बॅश लीग असणार असल्याने पीसीबीने मोठा निर्णय घेत बाबर आझम, मोहम्मद रिजवान, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफला संघातून बाहेर ठेवले आहे.
तर दुसरीकडे श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघात फिरकीपटू शादब खानचा देखील समावेश करण्यात आला आहे. दुखापतीनंतर तो पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संघात परतला आहे. याच बरोबर नॉनकॅप्ड विकेटकीपर-फलंदाज ख्वाजा नाफेचा पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे. ही मालिका पाकिस्तानला 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषक 2026 च्या तयारीसाठी महत्त्वाची आहे.
पुण्यात महायुतीत राडा, रवींद्र धंगेकर घेणार मोठा निर्णय? लवकरच होणार घोषणा-
पाकिस्तान संघ:
सलमान अली आघा (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, ख्वाजा नाफे (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, साहिबजादा फरहान (विकेटकीपर), सैम अयुब, शादाब खान, उस्मान खान (विकेटकीपर), उस्मान तारिक.
