Asia Cup 2025 : अखेर बाबर आशिया कप खेळणार, संघात मिळाली मोठी जबाबदारी

Asia Cup 2025 : अखेर बाबर आशिया कप खेळणार, संघात मिळाली मोठी जबाबदारी

Asia Cup 2025 : पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी पाकिस्तानकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात स्टार फलंदाज बाबर आझमला (Babar Azam) स्थान मिळालेला नाही. तर दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बाबरला आशिया कप संघात स्थान मिळाले आहे. इतकेच नाही तर बाबरकडे संघाचा उपकर्णधारपद देखील देण्यात आले आहे. 9 सप्टेंबरपासून होणाऱ्या आशिया कप 2025 साठी आता हाँगकाँगने (Hong Kong) आपला संघ जाहीर केला आहे. या संघाचा उपकर्णधारपद बाबरकडे देण्यात आले आहे. तर या संघात भारतात खेळणारा आशुमन रथला देखील स्थान देण्यात आले आहे.

यासिम मुर्तझा कर्णधार

आशिया कप 2025 साठी हाँगकाँगने 20 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. क्रिकेट हाँगकाँगने आशिया कप 2025 साठी यासिन मुर्तझाला (Yasin Murtaza) संघाचा कर्णधार बनवले आहे, तर बाबर हयातला (Babar Hayat) उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याचबरोबर या संघात भारतात खेळलेल्या अंशुमन रथलाही (Anshuman Rath) स्थान देण्यात आले आहे. हाँगकाँग पाचव्यांदा आशिया कपमध्ये सहभागी होणार आहे. यापूर्वी 2004, 2008, 2018 आणि 2022 मध्ये या स्पर्धेत हाँगकाँगने भाग घेतला आहे. एसीसी प्रीमियर कप 2024 द्वारे हाँगकाँग संघाने आशिया कप 2025 मध्ये आपले स्थान निश्चित केले.

 यूएईमध्ये सराव

क्रिकेट हाँगकाँगने दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँग संघ आशिया कप तयारी शिबिरासाठी यूएईला जात आहे. या दौऱ्यात आशिया कपपूर्वी संघाच्या योजना सुधारण्यासाठी डिझाइन केलेले अनेक तयारी सामने आणि सराव सत्रे समाविष्ट असतील. तर संघाचे प्रशिक्षक कौशल सिल्वा म्हणाले की, हाँगकाँग संघ आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करेल. त्यांनी सांगितले की, या संघात अनेक महान खेळाडू आहेत, ज्यांच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. हाँगकाँग आशिया कपमध्ये आपला पहिला सामना 9 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल.

मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेस आक्रमक, सरकारला बांगड्यांचा आहेर 

आशिया कपसाठी हाँगकाँग संघ

यासीम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात (उपकर्णधार), झीशान अली (यष्टीरक्षक), नियाझाकत खान मोहम्मद, नसरुल्लाह राणा, मार्टिन कोएत्झी, अंशुमन रथ, एहसान खान, कल्हान मार्क छल्लू, आयुष आशिष शुक्ला, मोहम्मद एजाज खान, अतीक-उल-रेहमान, मोहम्मद खान इक्बाल, अदिक-उल-रेहमान, मोहम्मद खान इक्बाल, अनाहूद खान. अर्शद, अली-हसन, शाहिद वासीफ (यष्टीरक्षक), गझनफर मोहम्मद आणि मोहम्मद वहीद.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube