Babar Azam : PCB देणार बाबर आझमला पुन्हा धक्का, पाकिस्तान क्रिकेटमध्ये लवकरच होणार मोठा निर्णय!
Babar Azam : बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका गमावल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) आणि स्टार फलंदाज बाबर आझमवर (Babar Azam) चारही बाजूने टीका करण्यात येत आहे. यातच पीसीबीकडून (PCB) आता एक मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. जर पीसीबीने हा मोठा निर्णय घेतला तर बाबर आझमला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
सध्या बाबर आझम वनडे आणि टी-20 मध्ये पाकिस्तानचा कर्णधार आहे. विश्वचषक 2023 आणि टी-20 विश्वचषक 2024 मध्ये खराब प्रदर्शन केल्याने पीसीबी वनडे आणि टी-20 मध्ये बाबर आझमकडून कर्णधार पद घेण्याची तयारी करत आहे. वनडे, टी-20 आणि कसोटीमध्ये सध्या पाकिस्तानचा संघ खूपच खराब कामगिरी करत आहे. त्यामुळे आता पीसीबी पुन्हा एकदा संघात मोठा बदल करण्याचा निर्णय घेत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार, पीसीबी मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) तिन्ही तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार पद देण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे आता कसोटी कर्णधार शान मसूदसह (Shan Masood) बाबर आझमलाही कर्णधारपद गमवावे लागणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात डाव घोषित केल्यानंतर बांगलादेशने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला तर दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला.
तर दुसरीकडे टी -20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता आणि एकदिवसीय 2023 विश्वचषकात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला होता.
Dead Butt Syndrome : … तर उभे राहणेही कठीण होणार, जाणून घ्या काय असतो डेड बट सिंड्रोम?
तसेच गेल्या काही कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाचा घरच्या मैदानात रेकॉर्ड खूप खराब आहे. पाकिस्तान पुढच्या महिन्यात घरच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका 07 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.