बांगलादेशकडून पराभव अन् पाकिस्तानला ICC ने दिला मोठा धक्का, जाणून घ्या नेमकं प्रकरण
PAK vs BAN: पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा (PAK vs BAN) 10 विकेट्सने पराभव करत इतिहास रचला आहे. या सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी बांगलादेशच्या (Bangladesh) गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पाकिस्तानवर विजय मिळवला. या विजयानंतर दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत बांगलादेशने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
तर दुसरीकडे आयसीसीने (ICC) देखील पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. आयसीसीने पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला दंड ठोकला आहे. याच बरोबर आयसीसीने बांगलादेश संघावरही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या नियमाप्रमाणे रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान पाकिस्तान आणि बांगलादेश संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळले आहे. या सामन्यात पाकिस्तानने ठराविक वेळेत 6 षटके कमी केली त्यामुळे पाकिस्तानने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे (WTC) सहा गुण गमावले आहे तर या सामन्यात ठरविक वेळेत 3 षटके कमी केल्याने बांगलादेशचे या स्पर्धेत 3 गुण कमी करण्यात आले आहे. याच बरोबर पाकिस्तान संघाला मॅच फीच्या 30 टक्के तर बांगलादेशला 15 टक्के दंड आयसीसीकडून ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात कॅप्टन शान मसूद आणि नजमुल हुसेन शांतो यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, त्यामुळे कोणतीही औपचारिक सुनावणी होणार नाही.
शाकिब अल हसनला दंड ठोठावला
तर दुसरीकडे बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) देखील आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या मॅच फीच्या 10% दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच आयसीसीकडून त्याला एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे.
‘घरात लग्न झालं नाही तरीही फडणवीसांचा राजीनामा मागतील’, नितेश राणेंचा ठाकरेंना टोला
पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात शकीबने पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानच्या दिशेने चेंडू फेकला होता त्यामुळे शाकिबवर आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.9 नुसार कारवाई करण्यात आली आहे.