Babar Azam चं काय होणार ?, पीसीबी ‘त्या’ प्रकरणात घेणार निर्णय

Babar Azam चं काय होणार ?, पीसीबी ‘त्या’ प्रकरणात घेणार निर्णय

Babar Azam : संपूर्ण क्रिकेट जगाचे सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबी (PCB) पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) बद्दल काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे. माहितीनुसार, येत्या काही दिवसात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टी20 मध्ये बाबर आजम कर्णधार राहणार की नाही याचा निर्णय घेणार आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तानचा प्रशिक्षक जेसन गिलेस्पी (Jason Gillespie) यांनी पुढील महिन्यापासून सुरु होत असलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेट सीझनपूर्वी कसोटी कर्णधार म्हणून शान मसूदवर (Shan Masood) विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे बाबर आझमच्या कर्णधारपदावर निर्णय कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पाकिस्तान यावर्षी बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीज आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.

आज (11 जुलै) पीसीबीची एक बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये  बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय निवडकर्ते, प्रशिक्षक जेसन गिलेस्पी आणि वाइटबॉल प्रशिक्षक गॅरी कर्स्टनसह सहाय्यक प्रशिक्षक अझहर महमूद उपस्थित होते. या बैठकीमध्ये 20 विश्वचषकातील संघाच्या खराब कामगिरीवरही चर्चा करण्यात आली.

या बैठकीनंतर बोर्डने सांगितले की, ऑगस्ट ते जानेवारी दरम्यान बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी मसूदला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कसोटी क्रिकेट आणि वाइटबॉल क्रिकेटसाठी ब्लूप्रिंट कशी तयार करता येईल यावर चर्चा झाली.

Bharuch Viral Video : नोकरीसाठी चेंगराचेंगरी, गुजरात मॉडेलवर काँग्रेसची टीका, पहा धक्कादायक व्हिडिओ

तर दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) म्हणाला की, आतापर्यंत पाकिस्तानचा कर्णधार म्हणून बाबर आझमला खूप संधी देण्यात आली आहे. मात्र त्याने एक कर्णधार म्हणून आपली योग्यता सिद्ध करता आलेली नाही. त्यामुळे आता पीसीबी आत्मपरीक्षण करून मोठा निर्णय घ्यावा.

पोर्श कार अपघात प्रकरणात अमितेश कुमारांवर काय कारवाई होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज