पोर्श कार अपघात प्रकरणात अमितेश कुमारांवर काय कारवाई होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Devendra Fadnavis : आज (11 जुलै) विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुण्यातील पोर्श कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात आतापर्यंत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर काय कारवाई केली किंवा काय कारवाई करणार ? असा सवाल उपस्थित केला होता.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या या प्रश्नला उत्तर देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर या प्रकरणात विरोधी पक्ष नेत्याने टाइमलाइन समजून घेतली तर त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. अरुण भाटिया एक चांगले अधिकारी आहे आणि त्यांनी पत्र लिहून अमितेश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे पण अलीकडच्या काळामध्ये काही लोकांना सवय आहे की, जर एखादा अधिकारी आपल्याला डोईजड होत असेल तर कोणालातरी पकडून पत्र लिहून त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करतात.
पुणे पोलिसांनी पोर्श कार अपघात प्रकरणात 8 वाजून 13 मिनिटांनी एफआयआर दाखल केली होती आणि त्यानंतर साडेदहा वाजता त्याठिकाणी वरिष्ठ अधिकारी आले होते. त्यांनी या प्रकरणात कलम 304 लावण्याचा आदेश दिला असं फडणवीस म्हणाले.
या प्रकरणात बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, जेव्हा हे प्रकरण न्यायालयासमोर आले तेव्हा पुणे पोलिसांनी आरोपीला सज्ञान म्हणून पहा अशी मागणी न्यायालयासमोर केली होती. परंतु या प्रकरणात बालहक्क न्यायालयाने आरोपीला निबंध लिहिण्याचे निर्देश दिले होते. मात्र पोलिसांनी यावर हरकत घेत पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यानंतर आरोपीची रवानगी कोठडीत झाली.
या प्रकरणात पुणे पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमितेश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू नये देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत, नितेश राणेंची होणार चौकशी, मुबई पोलिसांनी बजावली नोटीस
प्रकरण काय
19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले होते.