भाजपची ‘पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग’ की गुन्हेगारांचे अभयदान? अंबादास दानवे भडकले; कारण काय?

Ambadas Danve On llegal Abortion : जालना-भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंह राजपूतची काही फोटो

Ambadas Danve On Llegal Abortion

Ambadas Danve On llegal Abortion : जालना-भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंह राजपूतची काही फोटो सोशल मीडियावर भाजपच्या नेत्यांसोबत व्हायरल झाल्याने आता या प्रकरणात विरोधक भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात सोशल मीडियावर एक पोस्ट करत  भाजपची ‘पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग’ की गुन्हेगारांचे अभयदान? असा प्रश्न विचारला आहे.

तसेच एकीकडे पोलिसांना आरोपी सापडत नव्हता आणि दुसरीकडे तो नेत्यांसोबत फोटो काढत होता! हा सत्तेचा माज आहे की कायद्याची थट्टा? ज्या हातांत बेड्या असायला हव्या होत्या, तिथे भाजपचे उपरणे टाकताना तुम्हाला महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या शापाची भीती वाटली नाही का? असं देखील या पोस्टमध्ये अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

भोकरदन येथील डॉ. दिलीपसिंह राजपूत (Dr. Dilip Singh Rajput) याच्या रुग्णालयावर अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपातप्रकरणी जुलै महिन्यात कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. दिलीपसिंह राजपूत आणि त्याचा सासरा डॉ. के. एन. राजपूत (Dr. K. N. Rajput) सध्या दोन्ही फरार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असताना आतापर्यंत या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणात आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत सत्तेच्या हव्यासापोटी गुन्हेगारीचे इतके उघड समर्थन महाराष्ट्र आणि लोकांसाठी भयंकर आहे असं म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?

भाजपची ‘पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग’ की गुन्हेगारांचे अभयदान? जालना-भोकरदन हादरवून सोडणाऱ्या ‘अवैध गर्भपात’ प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंह राजपूत याने कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकली, पण भाजपच्या नेत्यांनी मात्र त्याला रेड कार्पेट घातले! ज्या नराधमाने पैशांच्या हव्यासापोटी कोवळ्या कळ्यांचा ‘कत्तलखाना’ उघडला, ज्याने मुलगा असूनही मुलगी असल्याचे सांगून गर्भपात केले आणि ४५ दिवस पोलिसांना गुंगारा दिला… तोच आरोपी आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला दिसतोय. हेच का तुमचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’? की ही तुमची नवीन *’पोलिटिकल ड्रायक्लिनिंग’* योजना, जिथे कायद्याने शोधलेला गुन्हेगार भाजपमध्ये जाताच ‘पवित्र’ होतो?

65 दिवस झाले तरी इंस्टाग्राम अपीलवर निर्णय नाही; अभिनेता विवेक सांगळे प्रतीक्षेत

एकीकडे पोलिसांना आरोपी सापडत नव्हता आणि दुसरीकडे तो नेत्यांसोबत फोटो काढत होता! हा सत्तेचा माज आहे की कायद्याची थट्टा? ज्या हातांत बेड्या असायला हव्या होत्या, तिथे भाजपचे उपरणे टाकताना तुम्हाला महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या शापाची भीती वाटली नाही का? सत्तेच्या हव्यासापोटी गुन्हेगारीचे इतके उघड समर्थन महाराष्ट्र आणि लोकांसाठी भयंकर आहे! असं या पोस्टमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

follow us