Video : अंबादास दानवेंचा ‘कॅश बॉम्ब’, पैशांचा बंडल असलेला व्हिडिओ पोस्ट अन् राजकारणात खळबळ

Ambadas Danve : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरु झाले असून या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे

  • Written By: Published:
Ambadas Danve

Ambadas Danve : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरु झाले असून या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत राज्याचे राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पैशांचा बंडलचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले आहे. राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसै नाहीत असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Winter Session of Maharashtra Assembly) कॅश सोबत दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करत अंबादास दानवे यांनी लिहिले की, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असं त्यांनी विचारले आहे. हा व्हिडिओ त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजप (BJP) महाराष्ट्राला टॅग करत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

T20 World Cup 2026 पूर्वीच आयसीसीला मोठा धक्का; JioStar ने 3 अब्ज करारातून घेतली माघार, कारण काय?

तर दुसरीकडे अंबादान दानवे यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमुळे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये विरोधक राज्य सरकारला घेरण्याचं प्रयत्न करणार आहे. तसेच या व्हिडिओबाबात राज्य सरकार आता काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

तक्रार करणार : अंबादास दानवे

तर दुसरीकडे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांसी संवाद साधला. यावेळी दानवे म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील काही आमदार व्हिडिओमध्ये दिसत आहे. मोठ्या नोटांच्या गड्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कोणाच्या आहेत, काय आहेत याची चौकशी झाली पाहिजे. मी याबाबत तक्रार करणार आहे. मी यात कोणाचं नाव घेत नाही पण पोलिसांनी हे शोधले पाहिजे असं माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले.

follow us