पुणे अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पलची अदलाबदल, आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

पुणे अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पलची अदलाबदल, आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

Pune Car Accident : पुणे अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पलची अदलाबदल करण्यात आली. आरोपीच ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आलं असा खुलासा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदते बोलत होते. पुढे बोलताना कुमार म्हणाले, दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड रिपोर्ट पुढे पाठवण्यात आले. आरोपीचे अगोदरच दुसरे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते असंही ते यावेळी म्हणाले आहेत. तसंच, ससूनमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितल.

 

Pune Accident : अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार; ससूनचे डॉ. तावरे अन् डॉ. हरलोर अटकेत

सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकलं

ब्लड रिपोर्ट आजून प्राप्त झाला नाही. परंतु, त्यामध्ये फेरफार केल्याचं उघड झालं आहे. याबाबत सर्व सीसीटीव्ही चेक केले आहेत. त्यानुसार कारवाई झाली आहे. तसंच, पुढेही जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. जे आरोपीच ब्लड सॅम्पल होत ते कचऱ्याच्या डब्यात फेकलं असा खुलासाही अमितेश कुमार यांनी केला आहे. यामध्ये श्रीहरी हरलोरने रक्ताचे नमुने बदलले अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

Pune Accident : “ब्लड रिपोर्टची गरज नाही, आमच्याकडे त्याहून मोठा पुरावा”: अमितेश कुमार

केसला शेवटापर्यंत घेऊन जाणार

सर्व प्रकारचे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. आमच्या बाजूने आम्ही पहिल्यापासून सर्व प्रयत्न करत आहोत. तसंच, आरोपीकडून कुणाला काही त्रास झाला तर आम्ही त्यांना कठोर शिक्षा करणार आहोत. त्यामुळे यामध्ये कुणीही संभ्रम निर्माण करू नये. आम्ही या केसला शेवटापर्यंत घेऊन जाणार आहोत असंही अमितेश कुमार यावेळी म्हणाले आहेत. तसंच, आम्ही कुणाचा तबाव आमच्यावर नाही असंही अमितेश कुमार यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज