पुण्यातल्या 6 तरुणांवर काळाचा घाला! नव्या थारमध्ये पिकनिकला निघाले अन् जीवाला मुकले, ताम्हिणी घाटात नेमकं काय घडलं?
ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडला असून नवीन थार थेट 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडलीयं. या अपघातात पुण्यातील 6 तरुणांची मृत्यू झालायं.
Thar Accident : नवीन कोरी थार घेतील, त्यानंतर मित्रांनी कोकणात फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला. मित्रांचा हा प्लॅन त्यांच्या जीवावर बेतलायं. पुण्यातील 6 तरुण नवीन थारमध्ये कोकण फिरण्यासाठी जात असतानाच ताम्हिणी घाटात त्यांच्यावर काळाने घाला (Thar Accident) घातलायं. ताम्हिणी घाटात 500 फूट दरीत थार कोसळून मोठा अपघात घडलायं. या अपघातात नव्या थारचा अक्षरश: चुरडा झाला असून 6 तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडलीयं. या घटनेनंतर रायगड पोलिस आणि रेस्क्यू टीमकडून बचाव मोहिम राबवत मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत.
आधारचं विदआऊट इंटरनेट अन् पेपरलेस व्हेरिफिकेशन करता येणार; सरकारचा भन्नाट प्लॅन वाचलात का?
पुण्यातील कोंडवे कोपर गावातील 6 तरुण रहिवाली असून गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील 6 तरुण कोकणात फिरण्यासाठी गेले होते. मंगळवार दि. 18 रोजी हा अपघात घडला असावा, असं बोललं जातंय. यातील एका तरुणाने नवीन थार घेतल्याने याच कारमध्ये सहाही तरुण फिरण्यासाठी गेले. दोन दिवसांपासून कुटुंबियांचा या तरुणांशी संपर्क होत नसल्याने कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम सुरु केल्यानंतर ताम्हिणी घाटात 500 फूट खोल दरीत कार आढळून आली. खोल दरीत ड्रोनच्या सहाय्याने या कारचा शोध लागला. त्यानंतर रेस्क्यू टीमने या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
धक्कादायक! पुण्यातील डेक्कनमध्ये रेस्टॉरंट आणि बारवर कोयत्याचा धाक दाखवत मध्यरात्री दरोडा
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे समोर आली असून प्रथम चव्हाण वय 23, ओंकार कोळी 20, श्री कोळी 19, पुनीत शेट्टी 21, शिवा माने 20, साहिल गोठे 24 अशी या तरुणांची नावे आहेत. ताम्हिणी घाटातील मध्यवर्ती भागातच मोठी दरी आहे. वाहनावरील ताबा सुटल्यानेच हा अपघात घडला असावा, असा अंदाज अनेकांकडून लावला जात आहे. मात्र, या तरुणांसोबत ताम्हिणी घाटात अपघातादरम्यान, नेमकं घडलं असेल तरी काय? याच उत्तर अनुत्तरितच आहे. काही दिवसांपूर्वीच यातील एका तरुणाने नवीन कोरी थार घेतली होती. याच कारमध्ये हे तरुण कोकणात फिरायला जाण्यासाठी प्रवास करीत होते.
घरमालकांनो…, भाडेकराराचे नियम बदलले, एक चूक अन् भरावा लागणार 5000 रुपये दंड; जाणून घ्या सर्वकाही
दरम्यान, ताम्हिणी घाटात प्रवास करताना अपघात घडून 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडालीयं. या अपघातानंतर बचावकार्याच्या टीमचे बचावकार्य सुरु आहे. तर हा अपघात नेमका कसा घडला असावा? याबाबत पोलिस यंत्रणेकडून शोध घेतला जात आहे.
