Pune Accident : पुण्यात मद्यधुंद चालकाने 12 विद्यार्थ्यांना उडविल्याचे प्रकरण, पोलिसांनी ठोकल्या कार मालकाला बेड्या

Pune Accident : पुण्यात मद्यधुंद चालकाने 12 विद्यार्थ्यांना उडविल्याचे प्रकरण, पोलिसांनी ठोकल्या कार मालकाला बेड्या

Pune Accident News Car Driver Hits 12 People : पुणे शहरातील (Pune) सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूल जवळ मोठा अपघात (Accident) झाला. एका कारचालकाने 12 जणांना उडविल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या अपघात प्रकरणी कार चालकासह त्याचा सहकारी आणि कार मालकाला अटक करण्यात (Pune Accident) आली. या तिघांनाही आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेमध्ये काही विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहासाठी एकत्रित आले होते. त्याचवेळी एक कार भरधाव वेगात आली, तिने या बारा विद्यार्थ्यांना बेदकारपणे उडवले. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची (Pune Police) माहिती मिळतेय. या चालकाचं नाव जयराम शिवाजी मुळे वय 27 वर्ष असल्याची माहिती मिळतेय. तर जयरामसोबत त्याचा सहकारी राहुल गोसावी होता. त्याला सुद्धा विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर कारचा मालक दिगंबर माधव शिंदे याला देखील अटक करण्यात आली आहे.

IMF कडून कर्ज घेण्यात पाकिस्तान नाही ‘हा’ देश अव्वल; भारतही कर्जदार, जाणून घ्या..

कारचा मालक दिगंबर माधव शिंदे कारची चावी निष्काळजीपणे गाडीला तशीच सोडून बाहेर गेला होता. त्यामुळे सहकारी जयराम मुळे याने स्वत:कडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना सुद्धा त्याच्य सहकारी राहुल गोसावी याच्यासोबत दारूच्या नशेत वाहन घेऊन गेला. त्यानी गाडी थेट सदाशिव पेठेत नेले अन् नियंत्रण सुटल्याने बारा जणांना उडवलंय या अपघात अकरा जण जखमी झाले आहेत. या अपघाताप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पाकिस्ताननंतर भारताचा ‘सख्खा’ शेजारी चीनच्या जाळ्यात, नव्या प्रस्तावाने भारताच्या डोकेदुखीत वाढ

या अपघातामध्ये अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद हे जखमी झाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube