IMF कडून कर्ज घेण्यात पाकिस्तान नाही ‘हा’ देश अव्वल; भारतही कर्जदार, जाणून घ्या..

IMF कडून कर्ज घेण्यात पाकिस्तान नाही ‘हा’ देश अव्वल; भारतही कर्जदार, जाणून घ्या..

IMF Loan : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडून जगातील देशांना कर्ज पुरवठा (IMF Loan) केला जातो. पण ज्यावेळी आयएमएफ आणि पाकिस्तानचा (Pakistan) विषय येतो तेव्हा वेगळीच चर्चा सुरू होते. कारण आर्थिक दृष्टीने पाहिलं तर पाकिस्तान आयएमएफवर जास्त अवलंबून आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात (India Pakistan Tension) संघर्ष सुरू असताना या संघटनेने पाकिस्तानला नव्याने कर्ज मंजूर केले होते. या कर्जाला भारताने विरोध केला होता मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

आयएमएफ कडून पाकिस्तानला भरपूर कर्ज मिळाले आहे यात वादाचा काही मुद्दा नाही. पण या संस्थेकडून कर्ज घेण्यात पाकिस्तान नंबर एक वर नाही. आणखीही काही देश आहेत ज्यांनी आयएमएफकडून भरमसाट कर्ज घेतलेले आहे. आयएमएफनुसार जगातील एकूण 91 देशांना दिलेल्या एकूण कर्जापैकी 60 टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज फक्त पाच देशांना मिळाले आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर अर्जेंटिना आहे. या देशावर आयएमएफचे 40.3 बिलियन एसडीआर (स्पेशल ड्रॉइंग राईट) आहे. टॉप टेन कर्जदार देशांच्या यादीत पाकिस्तानही आहे.

पाकिस्ताननंतर भारताचा ‘सख्खा’ शेजारी चीनच्या जाळ्यात, नव्या प्रस्तावाने भारताच्या डोकेदुखीत वाढ

एसडीआर म्हणजे काय

एसडीआर आयएमएफची एक विशेष राखीव संपत्ती आहे. याची किंमत जगातील प्रमुख पाच चलनांच्या आधारावर निश्चित केली जाते. यामध्ये अमेरिकी डॉलर, युरो, चिनी रेनमिनबि, जपानी येन आणि ब्रिटिश पाउंड यांचा समावेश आहे. ही प्रत्यक्ष मुद्रा नाही. सदस्य देशांद्वारे वास्तविक चलनात देवाणघेवाण करण्यासाठी एक आधार आहे.

पाकिस्तानचा नंबर किती

आयएमएफ कडून सर्वाधिक कर्ज घेण्याच्या बाबतीत अर्जेंटिना पहिल्या क्रमांकावर आहे. युक्रेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. युक्रेनकडे आजमितीस 10.7 बिलियन एसडीआर थकबाकी आहे. यानंतर इजिप्त 8.2 बिलियन, पाकिस्तान 6.9 बिलियन, इक्वाडोर 6.4 बिलियन या देशांचा नंबर आहे. या यादीत पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान सध्या कर्ज घेण्यात आघाडीवर आहे. फक्त आयएमएफच नाही तर चीनकडूनही पाकिस्तानने मोठे कर्ज घेतले आहे.

भारतानेही घेतलंय IMF चं कर्ज

भारताने सुद्धा आयएमएफ कडून कर्ज घेतलं आहे. पण या यादीत भारताचा नंबर खूप खाली आहे. म्हणजेच भारताने अतिशय कमी प्रमाणात कर्ज घेतल आहे. या यादीत भारताचा नंबर 31 वा आहे. भारतावर आयएमएफची साधारण 1.98 बिलियन एसडीआर थकबाकी आहे. भारताने अत्यंत कमी प्रमाणात कर्ज घेतलं आहे. या कर्जाची परतफेड करण्यात भारत आज सक्षम आहे. अशी परिस्थिती पाकिस्तानची आहे. पाकिस्तानवर इतकं कर्ज आहे की या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी नवं कर्ज घ्यावं लागत आहे.

मोठी बातमी! पाकिस्तानने अख्खं शहरच गमावलं; ‘या’ शहराचा बलूच आर्मीने घेतला कब्जा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube