Simhachalam Temple Accident : मंदिरात भाविकांवर भिंत कोसळली; 8 जणांचा दबून मृत्यू, 4 जण जखमी

Simhachalam Temple Accident : मंदिरात भाविकांवर भिंत कोसळली; 8 जणांचा दबून मृत्यू, 4 जण जखमी

Simhachalam Temple Accident : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील चंदनोत्सवादरम्यान 20 फुट भिंत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं. तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर तत्काळ एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालपुडी अनित घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

‘अशी ही जमवा जमवी’ ची स्टार-स्टडेड संध्याकाळ! आमदार आशिष शेलार, सचिन पिळगांवकरसह अनेक कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थिती

ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. मुसळधार पावसामुळे रांगेच्या रस्त्यालगत असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ अचानक भिंत कोसळली. ही भिंत नव्याने बांधण्यात आली असून पावसामुळे माती शिथिल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्याच्या गृहमंत्री वांगलापुडी अनिता यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सांगितले की, मुसळधार पाऊस आणि भाविकांच्या दबावामुळे हा अपघात झाला. ३०० रुपयांचे विशेष दर्शन तिकीट घेऊन भाविक रांगेत उभे होते. पावसामुळे भिंत पाण्याने भिजली होती आणि कमकुवत झाली होती.

राऊतांचे दावे फोल ठरले; फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर शिफ्ट; गृहप्रवेश करताच मिळाली ‘गुड न्यूज’

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी हरेंधीर प्रसाद आणि पोलिस आयुक्त शंख ब्रत बागची हेदेखील घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

तीन महिलांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून मृतदेह विशाखापट्टणमच्या किंग जॉर्ज रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जखमींवर ही तेथे उपचार सुरू आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या