अंतर्गत व्यवहारांवर नाराजी; HDFC बँकेचे चेअरमन अतनु चक्रवर्ती यांचा राजीनामा, केकी मिस्त्री यांची तात्पुरती नियुक्ती
हा निर्णय काही अंतर्गत घडामोडी आणि पद्धती आपल्या वैयक्तिक मूल्ये व नैतिकतेशी सुसंगत नसल्याचे कारण देत घेतल्याचे स्पष्ट केले.
HDFC Bank Chairman Atanu Chakraborty resigns : HDFC बँकेच्या शेअर्सवर गुरुवारी मोठा परिणाम दिसून आला, कारण बँकेचे अंशकालीन अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी हा निर्णय काही अंतर्गत घडामोडी आणि पद्धती आपल्या वैयक्तिक मूल्ये व नैतिकतेशी सुसंगत नसल्याचे कारण देत घेतल्याचे स्पष्ट केले. आपल्या राजीनामा पत्रात चक्रवर्ती यांनी नमूद केले की, मागील दोन वर्षांत बँकेतील काही घडामोडी आणि कार्यपद्धती त्यांनी पहिल्या, ज्यामुळे हा निर्णय घेण्यास ते प्रवृत्त झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात HDFC Ltd आणि HDFC Bank यांच्यातील ऐतिहासिक विलीनीकरणासारख्या महत्वाच्या टप्प्यांचा उल्लेख करत, या प्रक्रियेमुळे बँक देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक बनल्याचे देखील सांगितले.
मात्र, या विलीनीकरणाची पूर्ण फायदे अजून दिसून येणे बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात बँकेच्या अमेरिकन डिपॉझिटरी रिसिटसमध्ये मोठी घसरण झाली. हे ADRs 7.28 टक्क्यांनी घसरून 26.62 डॉलरवर बंद झाले. या घसरणीमागे जागतिक आर्थिक अनिश्चितता, गुंतवणूकदारांचा वाढत धोका टाळण्याचा कल, तसेच अध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या गव्हर्नन्स संदर्भातील चिंता ही कारणे असल्याचे मानले जात आहे. विलीनीकरणानंतरच्या समाकलन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
महसूल खात्यात इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याची महसूलमंत्री बावनकुळेंची कबुली
आपल्या पत्रात चक्रवर्ती यांनी लिहिले, मी मे 2021 मध्ये बँकेच्या संचालक मंडळात सहभागी झालो. माझ्या कार्यकाळात HDFC Ltd सोबतचे विलीनीकरण हे अत्यंत महत्वाचे पॉल होते, ज्यामुळे बँक एक मोठा समूह बनली. मात्र, काही अंतर्गत घडामोडी माझ्या वैयक्तिक मूल्यांशी जुळणाऱ्या नव्हत्या, त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी संचालक मंडळ, वरिष्ठ व्यवस्थापन, स्वतंत्र संचालक आणि इतर सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. बँकेच्या मध्यम आणि कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये असलेली ऊर्जा हा भविष्यातील संस्थेचा मजबूत पाया ठरेल, असे देखील त्यांनी नमूद केले.
दरम्यान रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने केकी मिस्टी यांची HDFC बँकेच्या अंशकालीन अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. ही नियुक्ती 19 मार्च 2026 पासून पुढील 3 महिन्यांसाठी लागू राहणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.