राऊतांचे दावे फोल ठरले; फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर शिफ्ट; गृहप्रवेश करताच मिळाली ‘गुड न्यूज’

  • Written By: Published:
राऊतांचे दावे फोल ठरले; फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर शिफ्ट; गृहप्रवेश करताच मिळाली ‘गुड न्यूज’

मुंबई :  विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र, असे असतानाही ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (varsha bungalow) राहण्यास गेले नव्हते. त्यांच्या या कृतीमुळे विरोधकांनी मोठं रान उटवलं होतं. मात्र, आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर फडणवीस वर्षा बंगल्यात शिफ्ट झाले असून, गृहप्रवेश करताच त्यांना पहिली गुड न्यूजदेखील मिळाली आहे. याबाबत अमृता फडणवीस यांनी एक्सवर माहिती दिली आहे.

नावाप्रमाणेच विवेक अन् आडनावाप्रमाणे आतून गोड, नांगरे पाटलांची फणसाळकरांसाठी खास पोस्ट

वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरदेखील फडणवीस सागर बंगल्यातच राहत होते. त्यांच्या या कृतीमुळे विरोधकांकडून ना-ना प्रकारचे दावे करण्यात आले होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी तर, वर्षा बंगल्यात काळी जादू करण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे जाण्यासाठी घाबरत असल्याचे म्हटलं होतं. एवढेच काय तर, गुवाहाटीला कामाख्या देवीला नवस म्हणून रेडे कापले आणि त्याचे शिंग वर्षा बंगल्याच्या आवारात खोदकाम करून पुरले आहे, असे तेथील स्टाफ आणि कर्मचारी सांगतात, असाही दावा संजय राऊत यांनी केला होता.

अमृता फडणवीसांची पोस्ट काय?

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. आज (दि.30) आसीएससीने घेतलेल्या 10 बोर्डाच्या परिक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला.

पवित्र प्रांगणात राजकारण आणू नका, शरद पवारांनी फटकारलं…

राऊतांच्या दाव्यावर फडणवीसांनी काय दिलं होतं उत्तर

राऊतांच्या दाव्यानंतर फडणवीसांना आपण वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी का जात नाही याचे उत्तर दिले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. त्यापूर्वी तिथे काही छोटी-मोठी काम चालू आहेत. दरम्यानच्या काळात माझी मुलगी दहावीच्या वर्गात आहे. १७ तारखेपासून तिची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे ती म्हणाली की, माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी त्या बंगल्यात राहायला गेलो नाही असे फडणवीसांनी सांगितले होते. मात्र, आता 4 महिन्यांनंतर का होईना फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत असलेल्या वर्षा बंगल्यात शिफ्ट झाले असून, येथे गृहप्रवेश करताच त्यांना लेकीच्या निकालाची पहिली गुड न्यूज मिळाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube