Sushma Andhare : अमृता फडणवीस यांचे मराठी उच्चार म्हणजे कानात शिसे ओतणे
Amrita Fadnavis’s Marathi accent means pouring lead into the ear : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या कायम राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांच्यावर टीका करत असतात. आता पुन्हा एकदा अंधारेंनी अमृता फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. मध्यंतरी अमृत फडणवीस यांनी सुषमा अंधारे या माझ्यासारख्या दिसतात, असं वक्तव्य केलं. अमृता फडणवीस यांच्या या विधानावरच आता अमृता वहिनींना मी कोणत्या अँगलने त्यांच्या सारखी वाटत असेल बरे?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. हा सवाल करतांनाच त्यांनी अमृता फडणवीस यांच्या मराठी उच्चारांवर जोरदार टीका केली आहे. अमृता फडणवीस यांचे मराठी उच्चार म्हणजे कानात शिसे ओतणे, असं त्या म्हणाल्या. सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही टीका करत अमृता फडणवीस यांचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.
मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावरून सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस आणि यांच्यावर टीका केली. अमृता वहिनांनी मी त्यांच्यासारखी वाटते, असं त्या जाहीरपणे एका मुलाखतीत म्हणाल्या. मी सतत विचार करत होते की, त्यांना कोणत्या अॅंगलने त्यांच्यासारखवी वाटत असेल बरं? कारण, दिसायला तर त्या निश्चितपणे माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. श्रीमंतही आहेत. बाकी मला नरडं आहे. त्यांना गळा आहे. मग काय साधर्म्य असेल आमच्यामध्ये? असा सवाल केला.
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा
मग मला कधीतरी वाटलं की, कदाचित भाषा प्रभुत्व हे दोघातलं साम्य असेल का? पण छे, कालची मुलाखत आणि त्यातलं त्यांचं कॉन्टिनेन्टल उच्चारात मराठी ऐकलं अन् खात्री पटली की, आमच्यात साम्य असे काहीच असू शकत नाही. पण त्यापेक्षा मराठी मनाचे मानबिंदू असणारे मराठी भाषेचे पाईक, मराठी वाचवाचा ध्यास घेणारे, वेळप्रसंगी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ ची पुस्तके सुध्धा मराठीत व्हावीत यासाठी कृष्णकुंजचे रान हादरवणारे राजदादा यांना, मी बोल्ली, मला चान्स मिळाली, या टाईपच मराठी ऐकुन कानात शिसं ओतल्यासाखं झालं असेल, असा टोला लगावला.
सुषमा अंधारे यांनी या पोस्ट सोबत अमृता फडणवीस यांचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. त्यात अमृता फडणवीस ह्या सुषमा अंधारे याच्याविषयी बोलताना दिसत आहेत. त्या म्हणतात, की, सुषमा अंधारे या आधी मला अगदीच माझ्या सारख्या वाटायच्या. जे मनात आहे, तेच ओठांवर. त्या निडर असून कोणाला घाबरायच्या नाहीत. जे वाटलं ते बोलून मोकळ्या व्हायच्यात. मात्र, आता एक मोठा एक बदल झाला त्यांच्यात. तो बदल हा की, आता त्यांना जी बोलण्यासाठी स्क्रिप्ट मिळते ना, त्या स्क्रिप्टनुसार त्या बोलतात. प्रत्येकाविषयी. त्यामुळं आज सुषमा अंधारे ह्या सुषमा अंधारे उरल्या नाही आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क आहे. तिथे लक्ष देण्याची गरज आहे, असं अमृता फडणवीस या व्हिडिओत बोलत आहेत.