Pune Crime : हडपसरमध्ये गोळीबार! एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्याच्या लेकाचा पराक्रम, मस्तीत गोळी झाडली अन् त्याच्याच…

Shinde Party Supporters Son Shoots In Air At Hadapsar Area : पुण्यातून एक मोठी खळबळजनक बातमी (Pune Crime) समोर आली आहे. शिंदे गटाच्या (Eknath Shinde) कार्यकर्त्याच्या मुलाने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गोळीबार करत असताना त्याच्याच मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली. मस्तीमध्ये गोळी चालवल्याचं समजतंय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये (Shinde Party Supporters Son Shoots In Air) मोठं भीतीचं वातावरण आहे.
अलीकडच्या काळात पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांचं (Pune News) प्रमाण आधीच वाढलं आहे. त्यात अशा प्रकारची घटना समोर आल्यानं मोठी चिंता निर्माण होत आहे. ही घटना हडपसर येथील सातववाडीकडे जाणाऱ्या कॅनलरोड परिसरात घडली असल्याचं समजतंय.
धक्कादायक! अडीच हजार सरकारी महिला कर्मचारी निघाल्या लाडक्या बहिणी; पैशांची वसुली होणार?
नेमकं काय घडलं?
पुण्यातील हडपसर येथील सातववाडीकडे जाणाऱ्या कॅनलरोड येथे दोन दुचाकीवरून चौघे निघाले होते. त्यावेळी त्यांनी मस्तीमध्ये पिस्तुल लोड करत हवेत गोळीबार केला. यावेळीच गोळीबार करत असताना शिंदे गटाच्या नेत्याच्या मावस भावाच्या खांद्यातूनच गोळी आरपार गेली. रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान गावठी पिस्तुलातून हा गोळीबार झालाय. गोळी लागल्यानंतर जखमी तरुणाला तातडीने सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु गोळीबाराचा प्रकार असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ससून रुग्णालयात पाठवलं. ससून रुग्णालयाने ही सर्व माहिती मुंढवा पोलिसांना दिली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
महाराष्ट्रात खळबळ! पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या संशयावरून तिघे ताब्यात; दोघांना सोडले
ससून हॉस्पिटल पुणे येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे ससून हॉस्पिटल येथे जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना या घटनेतीस जखमी तरूण वैभव श्रावण गवळी (वय 20 वर्षे, धंदा. डिलिव्हरी बॉय,राहणार- केशवनगर , मुंढवा, पुणे) हा त्याचा मावस भाऊ सुमित खवळे आणि बसवराज सुतार यांच्यासह दिनांक 29 मे रोजी रात्री 08.15 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून हडपसर येथील पांढरे मळा कॅनॉ येथे वाढदिवसाकरिता जात होते. त्यावेळी सुमित खवळे याने त्याच्याजवळ अवैध्यरित्या बाळगलेल्या गावठी कट्ट्यामधून गोळीबार केला. यामध्ये त्याच्यासमोर त्याच्याच गाडीवर असलेल्या वैभव गवळी याच्या डाव्या खांद्यावर गोळा लागली अन् यात तो जखमी झाला.