Pune Crime : पुण्यात वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी कारवाई; शस्त्रं पुरवणारा सराइत गजाआड

  • Written By: Published:
Pune Crime : पुण्यात वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी कारवाई; शस्त्रं पुरवणारा सराइत गजाआड

Vanraj Andekar Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपींना कोयते, तसंच पिस्तूल पुरवल्याप्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केली. संगम संपत वाघमारे (वय २०, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असं अटक करण्यात आलेल्या सराइताचं नाव आहे. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आंदेकर यांच्या बहिणीलाही अटक करण्यात आली असून, तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Indian Army: लष्कराकडून दोघांचा खात्मा; दहशतवाद्यांचा डाव फसला, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

खून प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून सखोल तपास करण्यात येत आहे. आरोपींना शस्त्रे पुरवण्यात वाघमारे सामील होता. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, हवालदार जाधव, मोकाशी यांच्या पथकाने सापळा लावून वाघमारेला पकडलं. वाघमारेला अटक करून रविवारी न्यायलायात हजर करण्यात आलं. त्याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पुण्यात भाजपला मोठा धक्का! माजी आमदार शरद पवारांच्या गळाला, थेट उमेदवारीच जाहीर

कट रचून केला खून

खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली असून, पसार झालेल्या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. मंगळवारी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपींनी पिस्तूल, कोयते कोठून आणले, यादृष्टीने तपास सुरू आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. सखोल तपास करणे गरजेचे आहे, अशी माहिती तपास अधिकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी न्यायालयात दिली. आरोपींनी कट रचून आंदेकर यांचा खून केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube