महाराष्ट्रात खळबळ! पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या संशयावरून तिघे ताब्यात; दोघांना सोडले

महाराष्ट्रात खळबळ! पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या संशयावरून तिघे ताब्यात; दोघांना सोडले

India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजूनही (Indiao Pakistan Tension) कायम आहे. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी हेरगिरीचं भारतातील जाळं उद्ध्वस्त करण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांना गजाआड केलं आहे. आता अशीच एक धक्कादायक बातमी ठाण्यातून आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे. या तिघांची चौकशी करून दोघांन सोडून देण्यात आलं आहे. तर एक आरोपी मात्र अजूनही एटीएसच्या ताब्यात आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या तिघा व्यक्तींना पकडले होते. पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तिघेजण पाकिस्तान इंटेलिजन्स ऑफिसच्या संपर्कात होते असा संशय एटीएसला होता. सन 2023 मध्ये झालेल्या देशविरोधी कृत्यांत त्यांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. ताब्यात घेऊन तिघांची चौकशी सुरू करण्यात आली.

दहशतवाद आणि संवाद एकत्र नाही, पीओके कधी सोडणार? शाहबाज शरीफकडून चर्चेची इच्छा, भारताचं सडेतोड उत्तर

या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या व्यक्तींना एका पाकिस्तानी महिला एजंटने हनी ट्रॅपमध्ये फसवलं. यानंतर तिने भारताबाबतची माहिती घेतली. नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या काळात व्हॉट्सअपच्या माध्यमातून भारताची महत्वाची माहिती पाकिस्तानला दिल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुप्त माहिती मिळाल्यानंतर एटीएसने तिघांना ताब्यात घेतले होते. यातील दोघा जणांना सध्या सोडून देण्यात आलं आहे. मात्र त्यांना भविष्यात पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं.

पाकिस्तानी हँडलर्सना संशयित डेटा दिला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. तेव्हापासून दोन्ही राज्यांतून कमीत कमी सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हिसार येथील ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्राही आहे. या लोकांवर पाकिस्तानी हँडलर्सना संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप आहे. 11 मे रोजी पंजाब पोलिसांनी मालेरकोटला येथून दोघा जणांना ताब्यात घेतले होते. हरियाणा पोलिसांनी 13 मे आणि 15 मे रोजी दोघा जणांना अटक केली. 7 मे आणि 14 रोजी आणखी दोघांना अटक करण्यात आली होती.

राजस्थानात खळबळ! पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली सरकारी कर्मचाऱ्याला ठोकल्या बेड्या

follow us
  • fb
  • instagram
  • youtube