धक्कादायक! पुण्यातील डेक्कनमध्ये रेस्टॉरंट आणि बारवर कोयत्याचा धाक दाखवत मध्यरात्री दरोडा
robbery पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे अनंत रेस्टॉरंट आणि बारवर मध्यरात्री कोयत्याची दहशत दाखवत दरोडा टाकला.
Midnight robbery at a restaurant and bar by fear of the reaper in Deccan, Pune : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुणे शहरामध्ये टोळीयुद्ध सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याता कोयता गॅंगने देखील डोकेवर काढले आहे. याच कोयता गॅंगने पुण्यातील डेक्कनमध्ये रेस्टॉरंट आणि बारवर कोयत्याचा धाक दाखवत मध्यरात्री दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेचे हादरवून सोडणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
नेमकी घटना काय?
पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे अनंत रेस्टॉरंट आणि बारवर मध्यरात्री कोयत्याची दहशत दाखवत दरोडा टाकला. या घटनेत दरोडेखोरांनी रेस्टॉरंट आणि बारच्या गल्ल्यातून सुमारे 15 ते 20 हजार चोरून पळून गेले आहेत.या घटनेचे हादरवून सोडणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
नाराज शिंदेंनी शाहंसमोर वाचला फडणवीस अन् चव्हाणांच्या तक्रारीचा पाढा? म्हणाले, मी रडणारा नाही…
मिळालेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत अनंत रेस्टॉरंट व बार या ठिकाणी साधारणत मंगळवारी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास चार इसम मास्क लावून बंद केलेले शटर जबरदस्तीने उचकटून गल्ल्यातील अंदाजे 15 ते 20 हजार रुपये चोरले . इतकेच नव्हे तर त्यांनी हॉटेलची काच फोडत मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
