राज्यातील 44 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलिस आयुक्त

राज्यातील 44 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलिस आयुक्त

Maharashtra Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या (Maharashtra Police) बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. राज्य पोलिस सेवेतील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने जारी केले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar) यांना बढती देऊन होमगार्डचा पदभार देण्यात आला आहे. नागपूर शहराचे पोलिस आयुक्त असलेले अमितेश कुमार (Amitesh Kumar) आता पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त असतील.

वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्रकुमार सिंघल हे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असतील. गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना पदोन्नती देऊन नक्षलविरोधी अभियानासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अजयकुमार बन्सल हे जालना जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक असतील. यापूर्वी अजयकुमार बन्सल हे मुंबई विभागाचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Maharashtra Police

Maharashtra Police

Maharashtra Police 2

Maharashtra Police

Maharashtra Police 3

Maharashtra Police

Maharashtra Police 4

Maharashtra Police

Maharashtra Police 5

Maharashtra Police

Maharashtra Police 6

Maharashtra Police

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज