कुख्यात गुंड गणेश मारणेला अटक; ओला-उबेर गाडीतून घेतलं ताब्यात

कुख्यात गुंड गणेश मारणेला अटक; ओला-उबेर गाडीतून घेतलं ताब्यात

Sharad Mohol Murder Case : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड गणेश मारणे (Ganesh Marne) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने ताब्यात घेतलं आहे. गणेश मारणे याच्यावर शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा आरोप आहे. या प्रकरणी गणेश मारणे याने वकिलामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर गणेश मारणे फरारच होता. अखेर आज संगमनेरमध्ये ओला-कुबेर गाडीतून प्रवास करताना गणेश मारणेला पोलिसांनी अटक केली आहे.

‘जरांगेंची आजची पत्रकार परिषद फंबल स्वरुपाची’; लक्ष्मण हाकेंचा घणाघात

शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र,तपासाअंती गणशे मारणे आणि विठ्ठल शेलार हे या हत्येचे सुत्रधार असल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून गणेश मारणे फरार होता.

परिक्षेतील गैरव्यवहारांना चाप बसणार; मोदी सरकार याच अधिवेशनात आणणार नवा कायदा!

अखेर पोलिसांनी त्याचा पाठलाग करत गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पुणे पोलिसांच्या बेड्या ठोकल्या आहेत. शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्या शोधासाठी गुन्हे शाखेने दहा पथके स्थापन करण्यात आली होती. एकीकडे तपासात नाव समोर आलं तर दुसरीकडे गणेश मारणे याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मोहोळवर गोळ्या झाडणाऱ्यांनी घटनास्थळावर गणेश मारणेचे नाव घेतले होते, त्यामुळे हा गंभीर गुन्हा असून जामीन देता येणार नसल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची ५ जानेवारी रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुरुवातीला आठ आरोपींना अटक केली होती. दरम्यान, शनिवारी आणखी तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आरोपींनी गोळीबाराचा सराव केला होता. त्यांना शस्त्रे आणि पैसे कोणी पुरवले, याचाही पोलिस तपास करत आहेत.

तपास करत असताना पनवेल पोलिसांच्या पथकाने पनवेल आणि वाशी येथील मोहोळच्या कटातील मुख्य आरोपी रामदास मारणे याच्यासह सहा जणांना अटक केली आहे. यात तीन मुख्य आरोपी आणि इतर संशयित आहेत. के पनवेल किंवा वाशी येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पनवेल पोलिसांनी पनवेल येथील फार्म हाऊसवर कारवाई करून आरोपीला अटक केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज