‘जरांगेंची आजची पत्रकार परिषद फंबल स्वरुपाची’; लक्ष्मण हाकेंचा घणाघात

‘जरांगेंची आजची पत्रकार परिषद फंबल स्वरुपाची’; लक्ष्मण हाकेंचा घणाघात

Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आजची पत्रकार परिषद एकदम फंबल स्वरूपाची होती, अज्ञान प्रकट करणारी होती, असा घणाघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची परिस्थिती आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु असतानाच अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानंतर ओबीसी नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. अशातच आज जरांगे पाटलांनी मंडल आयोगालाही चॅलेंज करणार असल्याचा इशारा दिल्याने ओबीसी नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

“मनोज जरांगे अन् आरक्षणाच्या वादापासून चार हात लांबच रहा” : अजितदादांच्या आमदार अन् मंत्र्यांना सूचना

लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगे यांचा बोलावता धनी कोण आहे, त्यांच्या आंदोलनाला कोण फूस लावतं, आरक्षण विरुद्ध बाह्यशक्तींचा त्यांना मोठी फिडींग आहे कारण ओबीसींना जे पाहिजे आहे ते मराठा समाजाला हवं आहे ही त्यांची आग्रहाची मागणी आहे. काय मिळालं ओबीसी समाजाला तुम्ही म्हणताय की ओरबाडून खालंय
पण आता तरी कुठं ओबीसींचा सरंपच होतोयं जिल्हा परिषदा ग्रामपंचायतीत कुठतरी ग्रामपंचायत सदस्य होत आहे, तुम्ही इथली कारखानदारी, शिक्षणसंस्थेवर काहीच बोलत नाहीत विधानसभेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदारांवर अजिबात बोलत नाही, खासदारांवर कधीही बोलत नाहीत असा हल्लाबोल हाके यांनी केला आहे.

‘मंत्रिमंडळाला विश्वासात न घेताच मराठा आरक्षणाचा अध्यादेश’; भुजबळांनंतर वडेट्टीवारांनीही ठेवलं बोट

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या जेजमेंटवर तुम्ही बोलत नाहीत. म्हणजे तुम्हाला झुंडशाहीच्या जीवावर आरक्षण पाहिजे. तुम्ही धनगर, मुस्लिम आरक्षणावर बोलताय तुम्ही पुतणा मावशीच प्रेम आणू नका आरक्षणामध्ये. तुम्हाला आमच्या ताटतलं आरक्षण हवंय, आत्ता तुम्ही ताट हिसकावून घेत आहात, आम्हाला ताट द्या नाहीतर हे बंद करुन टाका तुम्हाला राज्यात ओबीसींसोबत पुढच्या काळातली लढाई लढावी लागणार असल्याचं हाकेंनी स्पष्ट केलं आहे.

Ankita Lokhande: अंकिता लोखंडेने बिग बॉस 17 मधील तिच्या अनफिल्टर्ड गेमने जिंकली प्रेक्षकांची मन

दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्राची विण मोडू नका. या महाराष्ट्रात अनेक मोठे नेते झालेत. इथे त्यांना राज्याचं सगळं माहिती आहे. यामध्ये तुम्ही आलात तर छोटे छोटे समूह टिकणार नाहीत. लोकशाहीत जर मताला किमंत असेल तर छोट्या जात समूहांना कसं प्रतिनिधित्व देणार आहात? तुम्ही कायद्याचं उल्लंघन करणार आहेत फंबल करणारी आजची तुमची पत्रकार परिषद होती, असंही ते म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज