ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंच्या गाडीवर हल्ला; बीडच्या धारुरमध्ये घडला प्रकार…

ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना काल बीडच्या धारुर-इंदापूर रोडवर घडलीयं.

Mangesh Sasane

Mangesh Sasane : ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे (Mangesh Sasane) यांच्या गाडीवर काल रात्रीच्या सुमारास हल्ला झाल्याची घटना घडली. बीडच्या धारुर-इंदापूर मार्गावर ही घटना घडली असून दोन दुचाकीस्वारांनी मागील बाजूने दगडफेक केल्याचं ससाणे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. या प्रकरणी ससाणे यांनी धारुर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार देऊन गुन्हा दाखल करणार असल्याचंही स्पष्ट केलंय.

मेस्सीच्या कार्यक्रमातील राड्यानंतर ममता बॅनर्नीजींचा माफीनामा अन् थेट चौकशीचे आदेश

ओबीसी आंदोलक पवन कंवरवर यांच्यावर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये पवन कंवरवर जखमी झाले होते. या हल्लानंतर ओबीसी नेत्यांकडून दखल घेण्यात येत होती. याचकामी ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे माजलगाव पोलिस ठाण्यात अद्याप आरोपी अटक का केली जात नाहीत? असा कायदेशीररित्या जाब विचारण्यासाठी आले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास ते पुण्याकडे निघाले असता त्यांच्या गाडीवरही हल्ला झाल्याचं समोर आलंय.

विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्री नायडू काय म्हणाले?, इंडिगोवर थेट भाष्य

या प्रकरणी बोलताना ससाणे म्हणाले, माजलगाव पोलिस स्टेशननंतर तिथून निघाल्यानंतर हॉटेल विसावामध्ये आम्ही जेवण केलं. तिथून धारुर मार्गे इंदापपूरला येत असतानाच दोन दुचाकीवर काही लोकं आले आणि गाडीवर मागून दगड मारले. यामध्ये गाडीच्या काचेची तोडफोड झाली असून धारुर पोलिस ठाण्यात आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत. असे हल्ले करुन आम्ही घाबरणार असं वाटत असेल, तर मी रोजच माजलगावमध्ये येईल. आम्ही कायदेशीर मार्गाने अन्याय होतो तिथं जाब विचारला गेलो तर हे असे हल्ले होत आहेत. दगडफेक करुन आम्ही काही मागे हटणार नाही. रोजच माजलगावात येणार असल्याचा इशाराच मंगेश ससाणे यांनी यावेळी दिलायं.

तीन महिन्यांत केवळ 98 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र; मुख्यमंत्री साहेब अन् विखे पाटील साहेब म्हणत जरांगेंचा इशारा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पवन कंवर यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यांनतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माजलगाव येथे पवन कंवर यांची भेट घेतली. लक्ष्मण हाके यांनी या हल्ल्यामागे आमदार विजयसिंह पंडीत याच्या कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. हाके म्हणाले की,गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या सोबत आरोपींचे फोटो आहेत. तसेच याच कार्यकर्त्याने फेसबुकवर पोस्ट केली होती. यामध्ये त्याने विजयसिंह पंडित यांना उद्देशून म्हटले होते की, मला काम देऊ नका, परंतु हाके याला ठोकायची परवानगी द्या, असा गंभीर आरोप हाके यांनी केला आहे.

follow us