दोन्हीकडेही गोड बोलून वार करु नका; सभा ‘ओबीसीं’ची पण जरांगेंचा फडणवीसांवरच भडकले…

दोन्हीकडेही गोड बोलून वार करु नका, या शब्दांत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतलायं.

Devendra Fadanvis

Manoj Jarnage News : देवेंद्र फडणवीससाहेब (Devendra Fadanvis) ओबीसी अन् मराठा समाजावर गोड बोलून वार करु नका, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलायं. दरम्यान, बीडमध्ये आज ओबीसी समाजाचा एल्गार पुकारण्यात आलायं. या पार्श्वभूमीवर जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधलायं.

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार का? ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीससाहेब हा मोठा गेम असण्याची शक्यता आहे. फडणवीसांसोबत गप्पा मारायच्या, मोठेपणा दाखवायचा आणि फडणवीसांवरच वार करायचा हे त्यांना समजलं पाहिजे. फडणवीसांनी दोन्हीकडे गोड बोलू नये, मराठ्यांना शंका येईल असं पाऊल फडणवीसांनी उचलू नये, अशी तंबीच मनोज जरांगे यांनी दिलीयं.

तसेच दीड महिना झाला मी मुंबईत होतो, आत्ता पोरांना गाडीच्या नोटीसा येत आहेत. गोड बोलून आमच्यासाोबत दगाफटका करु नका. मराठ्यांच्या रोषाला सामोरे जाऊ नका. आम्ही अहिंसेच्या मार्गावर चाललोयं, पण सरकार गोड बोलून वार करतंय, फडणवीससाहेब पोरांचं आयुष्य उध्वस्त होईल असं करतील असं वाटत नाही, असंही मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलंय.

देशातील नक्षलवाद मार्च 2026 पर्यंत समूळ नष्ट करणार; केंद्रीय गृहमंत्री अमिद शाहांचा विश्वास

आम्ही बोळ्याने दूध पित नाही..
आमच्यावर कोण काय डाव करतंय एवढी आम्हाला अक्कल आहे. फडणवीसाहेबआम्ही बोळ्याने दूध पेत नाही, मी मॅनेज होत नाही म्हणून खोटेनाटे व्हिडिओ बनवत आहेत. मला गरीबांपासून तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे . बदनामीचं षडयंत्र करणाऱ्यांचा सामना मराठा समाजाला करावा लागणार असल्याचंही मनोज जरांगेंनी स्पष्ट केलंय.

कैद्यांना धर्मांतरासाठी मारहाण करणाऱ्या बीडच्या ‘त्या’ काराग्रह अधिकाऱ्याची अखेर उचलबांगडी

आजचा मोर्चा हा ओबीसींचा नाही…

बीडमध्ये आज होत असलेला मोर्चा हा ओबीसींचा नाही. हा काही ठराविक जातीच्या नेत्यांचा मोर्चा आहे. थोड्याच जाती तिथं दिसतील तो ओबीसीचा मोर्चा नाहीच. मराठा आरक्षणाचा जीआर रद्द होत नसतो एवढं सोप्प नाही. आम्ही एकटेच 50-55 टक्के आहोत. 75 वर्षातला पहिला जीआर आहे. वेळ आली तर मंडलसुद्धा राहत नाही. एका अध्यादेशावर मंडल जिवंत आहे , मला लय खोलात जायला लावू नका, असा इशाराही मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना दिलायं.

दरम्यान, बीडमध्ये आज ओबीसी समाजाकडून एल्गार पुकारण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात हा एल्गार असून मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील इतरही ओबीसी नेते या एल्गारमध्ये सामिल होणार आहेत. त्यामुळे आता या एल्गार मेळाव्यात ओबीसी नेते नक्की काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us