धमक्यांच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मोठा निर्णय! घात करून संपवण्याचीही भीती व्यक्त

Manoj Jarange यांना मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांनी पुढील वर्षभरासाठी त्यांचे दौरे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Manoj Jarange

Manoj Jarange’s big decision to stop touring for a year due to Fears of being assassinated and killed are also expressed : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे जरांगे हे आता त्यांचे नेहमी होणारे राज्य भरातील दौरे आगामी वर्षाभरासाठी थांबवणार आहेत. याचं म्हणजे जरांगे यांना मारण्याच्या धमक्या येत आहेत. तसेच त्यांना घात करून मारलं जाऊ शकत या भीतीमुळे या आपण हा निर्णय घेतला असल्याचं जरांगेंकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

मी समाजासाठी एक नवी यंत्रणा उभी करण्याचं काम हाती घेतलं आहे. समाजासाठी लढतोय मात्र मला रोज धमक्या येत आहेत. यात माझं कुटुंबही डावावर लागले आहे. पण मी मरणाला भीत नाही. असं विधान जरांगे यांनी केलं. ते सोलापुरातील करमाळा या ठिकाणी एका आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते.

कार पलटी होऊन विहिरीच्या कठड्यावर अडकली, होळी खेळायला जाणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

सोलापुरातील करमाळा तालुक्यातील वरकुटे मूर्तीचे येथे शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतीदिनासाठी जरांगे करमाळ्यात गेले होते. यावेळी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टि करण्यात आली. जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील देखील येथे उपस्थित होते.

ओपन एआयच्या पेंटागॉनसोबतच्या करारामुळे अमेरिकेत गोंधळ, सॅम ऑल्टमन यांनी काय दिलं स्पष्टीकरण

तर याच वेळी जरांगे यांनी त्यांचा एक मोठा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले की, मला रोज धमक्या येत आहेत. यात माझं कुटुंबही डावावर लागले आहे. पण मी मरणाला भीत नाही. पण आता मला कार्यक्रमाला बोलवणे बंद करा मला माझं काम करू द्या. मला कधी कुणी येऊन मारून टाकेल. त्यामुळे मी आता नेहमी होणारे राज्यभरातील दौरे आगामी वर्षाभरासाठी थांबवणार आहे.

follow us