देशातील नक्षलवाद मार्च 2026 पर्यंत समूळ नष्ट करणार; केंद्रीय गृहमंत्री अमिद शाहांचा विश्वास
भारताच्या दहा राज्यांमधील एकेकाळी 126 जिल्हे नक्षलप्रभावित होते. मात्र, आता हा आकडा हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मर्यादित झाला आहे.

नक्षलवादाचे देशभरातून जलदगतीने उच्चाटन होत (Naxalism) असून पुढच्या वर्षी म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपणार असा विश्वास देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या जिल्ह्यांची संख्या कमी होऊन आता ती तीनवर आली आहे, तर देशातील केवळ 11 जिल्ह्यांमध्येच नक्षलवादाचा काहीसा प्रभाव उरला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
भारताच्या दहा राज्यांमधील एकेकाळी 126 जिल्हे नक्षलप्रभावित होते. मात्र, आता हा आकडा हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मर्यादित झाला आहे. त्यात पुढच्या वर्षापर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपणार असल्याचा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला. नक्षलवाद संपवण्यात ऐतिहासिक टप्पा पार पडला असून सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या 6 वरून फक्त 3 वर आली आहे. तर नक्षलप्रभावित जिल्ह्यांची संख्या 18 वरून 11 पर्यंत कमी झाली आहे.
Video : “नक्षलवाद्यांच्या समाप्तीचा चॅप्टर सुरू; भूपतीच्या आत्मसमर्पणासाठी जंगलातही गेलो असतो
पंतप्रधान मोदींच्या दहशतवादमुक्त भारताच्या दृष्टिकोनातून, बंडखोरीविरोधी अथक कारवाया आणि लोककेंद्रित विकास डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांचा प्रभाव करत आहे. 31 मार्च 2026 पर्यंत, भारत नक्षलवादाच्या धोक्यापासून मुक्त होईल. गडचिरोलीतील नक्षलवादविरोधी लढ्याला आज मोठं यश मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज तब्बल 60 नक्षल्यांनी आपली शस्त्र खाली ठेवली. त्यात कुख्यात नक्षलवादी आणि नक्षल्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य सोनू उर्फ भूपती याचाही समावेश आहे.
महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर सक्रिय असलेला भूपती दीर्घकाळ नक्षल्यांचा रणनितीकार मानला जात होता. अनेक मोठ्या नक्षलवादी नेत्यांना घडवण्यात त्याची मोठी भूमिका होती. भूपतीनं आपल्या इतर साथीदारांसह आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर नक्षलमुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेला मोठं बळ मिळालं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आत्मसर्पण केलेल्या नक्षल्यांना संविधानाची प्रत सुपूर्द केली.
Historic milestone in eliminating Naxalism.
Today, number of most affected districts reduced from 6 to just 3, and affected districts to 11 from 18.Under Modi Ji's vision for a terror-free India, tireless counter-insurgency operations and people-centric development are…
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) October 15, 2025