मंत्रिमंडळात १६ जिल्ह्यांची पाटी कोरीच; पुणे-साताऱ्याचा राजकारणात दबदबा

मंत्रिमंडळात १६ जिल्ह्यांची पाटी कोरीच; पुणे-साताऱ्याचा राजकारणात दबदबा

Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काल एकूण ३९ आमदारांनी मंत्रि‍पदाची (Maharashtra Cabinet Expansion) शपथ घेतली. यातील ३३ आमदारांनी कॅबिनेट आणि सहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जिल्ह्यांचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. एकट्या पुणे जिल्ह्याच्या वाट्याला चार मंत्रिपद मिळाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात एकूण १० मंत्रि‍पदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मुंबई-कोकणला ९, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला ८ तर मराठवाड्याला ६ मंत्रि‍पदे मिळाली आहेत. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.

जिल्ह्यांनुसार मिळालेल्या मंत्रि‍पदांचा विचार केला तर एकूण १९ जिल्ह्यांना मंत्रि‍पदे मिळाली आहेत. यात सर्वाधिक मंत्रि‍पदे सातारा जिल्ह्याला मिळाली आहेत. पुणे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात तीन मंत्री झाले आहेत. पुणे जिल्ह्यात आता एकूण चार मंत्री झाले आहेत. अजित पवार यांनी आधीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील आणखी तीन आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता पुणे आणि सातारा जिल्ह्यांत चार-चार मंत्रि‍पदे मिळाली आहेत.

माहितीनुसार, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, सांगली, पालघर, लातूर, वाशिम, सोलापूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव, जालना या जिल्ह्यांत एकही मंत्रिपद नाही. या जिल्ह्यांचा राज्याच्या राजकारणात दबदबा आहेच. मात्र यंदा त्यांना संधी मिळालेली नाही. उर्वरित जिल्ह्यांत मात्र एक किंवा दोन या पद्धतीने मंत्रिपदे मिळाली आहेत. आता अडीच वर्षांपर्यंत तरी या स्थितीत काही बदल होणार नाही.

महायुतीत नाराजीची लाट! नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजप समर्थक आमदार थेट घरी

दरम्यान, रविवारी भारतीय जनता पार्टीच्या चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि संजय सावकारे यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदींनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube