… तर आम्ही आवाज उठवू; OBC उमेदवारीवरुन लक्ष्मण हाकेंचा इशारा
Laxman Hake : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर झाला असून प्रत्येक पक्षाकडून उमेदवार निवडण्याचे काम अंतिम
Laxman Hake : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर झाला असून प्रत्येक पक्षाकडून उमेदवार निवडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण जीआरवरुन सर्व राजकीय पक्षांना इशारा देत 2 सप्टेंबर रोजी निघालेल्या जीआरमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याच्या भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या. लक्ष्मण हाके यांनी आज पत्रकार परिषद घेत ओबीसी आणि पंचायतराज आरक्षण याबाबत पक्ष प्रमुखांना इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले की, जो जीआर (GR) काढण्यात आला आहे त्याचा काय परिणाम झाला आहे हे निवडणूक सुरु झाल्यावर दिसून येत आहे. त्यामुळे जिथे मुळ ओबीसी उमेदवारी डावलली जाईल त्याविरोधात आम्ही आवाज उठवू असा इशारा देत ज्यांनी मराठा आरक्षण जीआर काढण्यासाठी मदत केली होती त्यांच्यावर ओबीसी (OBC) बांधवांनी लक्ष ठेवावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
तर दुसरीकडे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत या सरकारने ओबीसी हक्क अधिकाराचे संरक्षण केले नसल्याचा आरोप केला आहे. तसेच 1820 नगरसेवक आणि 77 नगराध्यक्ष ओबीसीसाठी राखीव आहेत. 2 सप्टेंबर जीआर खोटा आहे आणि जर आपण शांत राहिलो तर ओबीसी आरक्षण संपणार, अनेक आमदार आणि खासदार लाज नसल्याप्रमाणे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे सांगत होते. तर आता सर्व पक्षाने आपली ओबीसीबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.
तसेच बारामती तालुक्यातील एका गावात बोगस ओबीसी प्रमाणपत्र आणून त्यांची फसवणूक केली,यातून ओबीसी आरक्षण संपवले जात आहे हे यातून कळतेय. ओबीसी जागेवर कुणबी तिकीट दिले तर आम्ही अख्खे पॅनल पाडू. सर्व पक्षाने ओबीसींची फसवणूक केली असल्याचा दावा देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला.
तर शरद पवार यांनी आता ओबीसी आरक्षणावर भूमिका घेती मात्र जेव्हा सरकारने जीआर काढला त्यावेळी भूमिका का घेतली नाही. मी शरद पवार यांच्या भूमिकेचा स्वागत करणार नाही. सर्व पक्षांनी ओबीसींचा घात केला असल्याचा दावा देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लक्ष्मण हाके यांनी केला.
