मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला डावलल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी घेतला मोठा निर्णय; आज जेजुरीतून…
Laxman Hake : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी जारी करण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा

Laxman Hake : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी जारी करण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी मागणी करत आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होत आहे. त्यामुळे सध्या राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बोलवले नसल्याने आता लक्ष्मण हाके यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
या बैठकीला बोलवले नसल्याने लक्ष्मण हाके (Laxman Hake) नाराज झाले असून ते आज जेजुरीमधून (Jejuri) आंदोलनाची हाक देणार आहेत. आज जेजुरी येथे लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलवलं नसल्याने लक्ष्मण हाके नाराज असून आज ते जेजुरीतून आंदोलनाची हाक दिली आहे. लक्ष्मण हाके यांनी आवाहन केल्यानंतर राज्यभरातून जेजुरी गडावर हजारो तरुण येत आहे. त्यामुळे जेजुरी गडावरुन लक्ष्मण हाके काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बैठक निष्फळ, 10 ऑक्टोबरच्या मोर्चावर ठाम
तर दुसरीकडे ओबीसी नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर काढलेला रद्द करण्यात यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली मात्र या बैठकीनंतरीही ओबीसी नेत्यांचे समाधान झाले नाही त्यामुळे 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सकल ओबीसी समाजाच्या मोर्चावर ओबीसी नेते ठाम आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी मागणी ओबीसी नेते करत आहे.
सोने आणि चांदीनंतर आता Bitcoin मध्ये तेजी? गुंतवणूकदारांना होणार फायदा; जाणून घ्या कारण
तर दुसरीकडे ओबीसी नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जातीवादी लोकांचं ऐकू नये, अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.