मेस्सीच्या कार्यक्रमातील राड्यानंतर ममता बॅनर्नीजींचा माफीनामा अन् थेट चौकशीचे आदेश

मेस्सीच्या चाहत्यांच्या झालेल्या गैरसोयींबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची माफी गैरव्यवस्थापनामुळे मी खूप अस्वस्थ आणि स्तब्ध.

  • Written By: Published:
Untitled Design (102)

Chief Minister Mamata Banerjee apologizes to Messi fans : स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी(Lionel Messi) हा त्याच्या ‘GOAT इंडिया टूर’ साठी भारतात आला होता. 13 डिसेंबर म्हणजेच आज सकाळी हा दिग्गज खेळाडू कोलकाता(Kolkata) येथे पोहोचला आणि चाहत्यांनी त्याची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. कोलकात्यामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर(Salt Lake Stadium) त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी मेस्सी आला होता. लाखो रुपयांचं तिकीट खरेदी कडून असंख्य चाहत्यांकडून त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र मेस्सीला पाहता न आल्याने हिरमोड होऊन चाहत्यांनी मोठा राडा घातला आहे.

Video : बार्टी अन् सारथीच्या PHD प्रवेश संख्येवर मर्यादा घालणार; अजितदादांची सभागृहात माहिती

त्यानंतर आता क्रीडाप्रेमी आणि मेस्सीच्या चाहत्यांच्या झालेल्या गैरसोयींबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(CM Mamata Banarji) यांनी माफी मागितली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, सॉल्ट लेक स्टेडियममध्ये आज झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे मी खूप अस्वस्थ आणि स्तब्ध आहे. त्यांच्या आवडत्या फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी जमलेल्या हजारो क्रीडाप्रेमी आणि चाहत्यांसह मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्टेडियमवर जात होते. या दुर्दैवी घटनेबद्दल मी लिओनेल मेस्सी, तसेच सर्व क्रीडा प्रेमी आणि त्याच्या चाहत्यांची मनापासून माफी मागते.

 

मी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करीत असून मुख्य सचिव आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासह असीम कुमार रे सदस्य म्हणून होते. ही समिती या घटनेची सविस्तर चौकशी करेल, जबाबदारी निश्चित करेल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांची शिफारस करेल. मी पुन्हा एकदा सर्व क्रीडा प्रेमींची मनापासून माफी मागते. अशा प्रकारची एक्स पोस्ट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

follow us