स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची भारतात एन्ट्री; GOAT India Tour ‘या’ 4 शहरांमध्ये करणार

Lionel Messi India Tour : सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारतात शनिवारी रात्री2.26 ला भारतात पोहचला आहे. यावेळी मेस्सीचा स्वागत

  • Written By: Published:
Lionel Messi India Tour

Lionel Messi India Tour : सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारतात शनिवारी रात्री2.26 ला भारतात पोहचला आहे. यावेळी मेस्सीचा स्वागत करण्यासाठी कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर हजारोंच्या संख्येत चाहाते उपस्थित होते. मेस्सी तीन दिवसीय या दौऱ्यावर भारतातील चार शहरांना भेट देणार आहे. 14  वर्षांनी भारतात पुन्हा एकदा भारतात मेस्सीची एन्ट्री झाल्याने चाहत्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मेस्सीने 2011 मध्ये शेवटाचा भारताचा दौरा केला होता.

शनिवारी सकाळी 9.30 मेस्सी कोलकाता येथे GOAT इंडिया टूर 2025 चे उद्घाटन करणार असून यानंतर तो एका भव्य संगीत कार्यक्रमात सहभागी होणार आहे. तसेच त्याच्या सन्मानार्थ बांधलेल्या 70 फूट उंच पुतळ्याचे अनावरण देखील मेस्सीच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शाहरुख खान आणि बायचुंग भुतिया यांच्यासह अनेक मान्यवरांना भेटतील.

कोलकाता येथील कार्यक्रमांनंतर, मेस्सी दुपारी 2 वाजता हैदराबादला रवाना होणार असून राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एक प्रदर्शनी फुटबॉल सामना खेळणार आहे. हैदराबादनंतर, मेस्सी मुंबई आणि नंतर दिल्लीला जाणार आहे. आपल्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेणार आहे.

मेस्सीला भेटण्यासाठी लाखो रुपयांचे पॅकेजेस

भारतात सध्या फुटबॉल चाहत्यांमध्ये मेस्सीसाठी (GOAT India Tour) तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे आणि याचाच फायदा आयोजक घेत असून मेस्सीसोबत वैयक्तिक भेटींपासून ते त्याचा सत्कार करण्यापर्यंतचे पॅकेजेस तयार केले आहेत. लाखो रुपयांचे वेगळे तिकीट स्लॉट करण्यात आले आहे. यापैकी अनेक स्लॉट आधीच बुक केले गेले आहेत मात्र आयोजकांनी अद्याप एकूण किती स्लॉट बुक केले आहेत आणि किती शिल्लक आहेत याची माहिती शेअर केलेली नाही.

‘या’ लोकांना व्यवसायात मिळणार यश; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार ?

भारत दौऱ्यादरम्यान कोलकातामध्ये मेस्सीला प्रत्यक्ष भेटण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी, त्याची स्वाक्षरी केलेली जर्सी घेण्यासाठी आणि त्याच्यासोबत जेवण करण्यासाठी प्रति व्यक्ती 9.95 लाख रुपये खर्च येईल. हे दोन लोकांसाठी 12.50 लाख रुपये आणि चार लोकांसाठी 25 लाख रुपये असेल.

follow us