आंदोलन पुण्यात येण्यापूर्वीच मेणाचा पुतळा, बच्चन-तेंडुलकरनंतर मनोज जरांगेंचा सन्मान

आंदोलन पुण्यात येण्यापूर्वीच मेणाचा पुतळा, बच्चन-तेंडुलकरनंतर मनोज जरांगेंचा सन्मान

Manoj Jarange statue : लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये (wax museum) देशातील लोकप्रिय व्यक्तींचे पुतळे बनवले आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांचे मेणाचे पुतळे बनवण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचाही मेणाचा पुतळा बनवण्यात आला आहे. जरांगे हे समाजासाठी खूप मोठे काम करत आहेत. त्यात आपलाही सहभाग असेल या आशेने मावळ तालुक्यातील एका तरुणाने हा मेणाचा पुतळा बनवला आहे.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीहून मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सायंकाळी ते पुणे जिल्ह्यात दाखल होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील त्यांचा शेवटचा मुक्काम लोणावळा येथे राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. हा पुतळा मावळ तालुक्यातील अशोक माळसकर या मराठा तरुणाने बनवला आहे.

Ayodhya Ram Mandir : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार होते तरी कुठे ?

अवघ्या तीन महिन्यांत हा पुतळा तयार झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या चळवळीची इतिहासात नोंद व्हावी यासाठी मावळ तालुक्यातील कार्ला येथे हा पुतळा बसवण्यात आला आहे.

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलार्ट मोडवर… उद्यापासून ‘मिशन सर्वेक्षण’ मोहिम

मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा बनवण्यात आला असून या पुतळ्याची उंची 5 फूट 7 इंच आहे. हा पुतळा मावळ तालुक्यातील अशोक माळसकर यांनी बनवला आहे. जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी खूप मोठे काम करत असून, आपणही समाजासाठी असेच काम करता यावे यासाठी हा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतल्याचे माळसकर यांनी म्हटले आहे. अवघ्या तीन महिन्यांत हा मेणाचा पुतळा उभारण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान; गोविंदगिरी महाराजांनी वक्तव्ये मागे घ्यावीत, रोहित पवारांची मागणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube