अंगावर गाडी घालून मला मारण्याचा धनंजय मुंडे यांचा कट; अजित पवारांकडून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न; मनोज जरांगेचे गंभीर आरोप
मुंबई येथील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांचे धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप.
Manoj jarange speaks on dhananjay munde and dcm ajit pawar : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी आज विविध विषयांवर मुंबई (Mumbai) येथे पत्रकार परिषद (Press Conferance) घेतली. यावेळी त्यांनी आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे यांनी माझ्या घातपाताची सुपारी दिली आहे. मी स्वतः नार्को टेस्टसाठी तयार असून माझी आणि धनंजय मुंडे यांची कधीही नार्को टेस्ट (Narco Test) करा. धनंजय मुंडे यांना माझ्या अंगावर गाडी घालायची आहे. त्यांनी मैदानात यावं. मी तयार आहे. असं वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमांशी (Media) बोलताना केलं आहे.
धनंजय मुंडे यांना मला मारायचं आहे. मागे पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींनी चौकशीदरम्यान धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं आहे. तरी देखील जालना पोलीस आणि गृहमंत्रालयानं धनंजय मुंडे यांना अटक का केली नाही? किंवा याबाबत त्यांची चौकशी का केली नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. फडणवीस देखील त्याला सांभाळत आहेत, अशा क्रूर माणसाला सांभाळू नका. पहिले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)असे नव्हते. हे जे काही चाललंय ते चांगलं नाही. ते क्रूर माणसांना पाठिंबा देत आहेत. फडणवीस पूर्वीसारखे वागले, तर गरिबांना न्याय मिळेल, हे देखील त्यांनी यावेळी नमूद केलं.
त्याचप्रमाणे मराठा आरक्षणावर देखील त्यांनी यावेळी भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणासाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापित करण्यात आलेली शिंदे समिती नोंदी शोधत नाही, मग सरकारने ही समिती तयारच कशाला केली? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. कुणबी नोंदी शोधण्यापासून रोखले जात आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात नोंदी शोधल्या जात नाहीत. प्रमाणपत्र दिली जात नाहीत. काही अधिकारी या सगळ्या कारवाईला अडथळा निर्माण करत आहेत. सरकारच्या जीआरप्रमाणे नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. सातारा, पुणे आणि औंध सरकारचा जीआर तातडीने काढा. नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला.
राज्य सरकारने साथीच्या सगळ्या योजना थांबवल्या आहेत. मराठा तरुणांना शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यांची हेळसांड केली जात आहे. सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करावी. त्यांना पीक विमा द्या. मालाला हमीभाव द्या, पाणी द्या. जर सरकार ही मदत देऊ शकत नसेल तर या सरकारला मतदानातून पाडावे. भीती निर्माण करा. तरच राजकारणी घाबरतील. 2029 च्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसणार आहे. कारण घातपात करणाऱ्याला पाठीशी घालत आहेत. भाजपचे अनेक आमदार आणि मंत्री मला भेटायला येतात. त्याचप्रमाणे मी करत असलेल्या कमला पाठिंबा देत असल्याचा दावा यावेळी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आला.
