‘उच्च जातीचं नाव काय?’ शिष्यवृत्ती परीक्षेतील जातीयवादी प्रश्नानं संतापाची लाट; संस्थेवर कारवाईची मागणी

यवतमाळमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत जातीयवादी प्रश्न विचारल्याने खळबळ; 'उच्च जातीचं नाव काय?' असा प्रश्न विचारल्याने संस्थेवर कारवाईची मागणी.

  • Written By: Published:
Untitled Design(70)

Casteist question in scholarship exam : इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता वाढून निकालाची टक्केवारी देखील वाढावी यासाठी यवतमाळ (Yavatmal) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत टार्गेट अप्स संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सराव मोहीम राबवली होती. यामध्ये जवळपास 24 हजार विद्यार्थी (Students) सराव करत होते. विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत (Online Exam) कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता या टार्गेट पीक अप्सच्या आठवीच्या दुसऱ्या ऑनलाईन सराव चाचणीच्या प्रश्न पत्रिकेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाने मोठा वाद निर्माण झाला आहे.

या ऑनलाईन चाचणीच्या प्रश्न पत्रिकेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नांच्या यादीत ‘उच्च जातीचं नाव काय?’ असा वादग्रस्त प्रश्न विचारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रश्नांचे पर्याय हे समाजातील वर्णव्यवस्थेला दाखवणारे असल्याने शिक्षकांसह शैक्षणिक वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे. कोणत्याही परीक्षेत असे जातिभेत करणारे प्रश्न विचारले जात असतील तर, विद्यार्थ्यांच्या मनातून जाती निर्मूलन कसं करणार? असा प्रश्नही बऱ्याच जणांकडून उपस्थित केला जात आहे.

मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख जाहीर

जातीयवादाला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नामुळे वातावरण चांगलच तापलं असून संबंधित संस्थेवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार आहे. या प्रश्नाबाबत संबंधित प्रश्नांची मांडणी आणि भाषा चुकीची होती. हे कारण लक्षात घेता त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवण्यात आला आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिली आहे.

या घटनेचे आता राजकीय पडसाद देखील उमटायला सुरूवात झाली असून या प्रकरणावर आता विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘या सगळ्या प्रकरणात पहिले जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे’. ‘कारण आपल्या घटनेत सर्वांना समान लेखलेलं आहे’. ‘आपण जातपात मांडायलाच नको’. ‘जात मानत असाल तरी कोणती जात उच्च आणि कोणती कनिष्ठ हे बिलकुल होत नाही’. ‘त्यामुळे असा प्रश्न विचारणे आणि विद्यार्थ्यांच्या मनात असा प्रश्न रुजवणे हे समाजाच्या दृष्टीनं चुकीचं आहे’. ‘कोणती जात उच्च हा काही प्रश्न होऊ शकतो का?, सगळ्या जाती सारख्याच आहेत’. विद्यार्थ्यांच्या मनात जात बिंबवणे हा गुन्हा आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

follow us